Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ (Viral Video) दररोज व्हायरल होत असतात. त्यापैकी काही आश्चर्यचकित करणारे तर काही हास्ययास्पद असतात. आज आम्ही तुम्हाला एक जुगाडू व्हिडीओ बद्दल सांगणार आहोत. प्रत्येक वाहनांचे हॉर्न हे ठरलेले असतात. सायकलचा ट्रिंन्ग ट्रिंग हॉर्न तसा सर्वांच्या परिचयाचा आहे. हा सायकलचा हॉर्न तसा सॉफ्टच असतो. मात्र एका पठ्ठ्याने सायकल ला चक्क चारचाकी गाडीचा हॉर्न लावला. याचाच व्हिडी ओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
काय आहे व्हिडीओ ? (Viral Video)
प्रवासादरम्यान इतर चालकांना सायकलच्या बेलचा आवाज मोठ्याने ऐकू जावा म्हणून की काय या व्यक्तीने बेलला एक वायर जोडून क्रेटा कारचे (Creta) दोन हॉर्न बसविले आहेत. पण, हे हॉर्न सायकलचे पॅण्डल (Viral Video) असतात तेथे जोडण्यात आले आहेत. हा व्हिडीओ @kalpesh_1204_gj04 या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आला असून यावर नेटकऱ्यानी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी या जुगाडाचे कौतुक केले आहे तर काही जणांनी असा हॉर्न सूट होत नसल्याचे म्हंटले आहे.
हल्ली अनेक प्रकारचे हॉर्न प्रचलित होत आहेत. हे हॉर्न (Viral Video) एक तर लक्ष वेधण्यासाठी किंवा रस्त्यावरील इतर वाहन चालकांना आव्हान म्हणून बसवले जातात. सायकलचा ट्रिंग ट्रिंग हॉर्न काढून एका पठ्ट्याने चक्क त्याच्या सायकल ला हुबेहूब क्रेटा चा हॉर्न बसवला आहे. हा जुगाडू सायकलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.




