Viral Video : बटाटा वडा हा महाराष्ट्रातला अत्यंत लोकप्रय खाद्यपदार्थ आहे. बटाट्याची भाजी डाळीच्या पिठात बुडवून हा वडा तळाला जातो. मात्र यामध्ये नवनवे बदल केले जात आहेत . बटाटा भाजी ऐवजी अंडे, वांगे असे पदार्थ तुम्ही पहिले असतील पण गुलाबजामून वडा कधी पाहिलाय का ? सध्या सोशल मीडियावर असाच काहीसा असलेल्या वाड्याची रेसिपी व्हायरल झालेली दिसत आहे. चला पाहूया नक्की काय आहे विडिओ (Viral Video) ?
खरेतर गुलाबजामून हि भारतीय व्यंजनांमधील अतिशय प्रसिद्ध स्वीट डिश आहे. अनेकांची ही आवडती डिश आहे. तर वडा हा पदार्थ वल्ड फेमस आहे. हे दोन्ही पदार्थ वेगवगेळे खाताना याची चव निव्वळ अप्रतिम असते. मात्र हे दोन्ही पदार्थ एकत्र केले तर ? असेच अजब गजब फूड फ्युजन सध्या सोशलवर (Viral Video) व्हायरल होत आहे.
काय आहे व्हिडिओ ? (Viral Video)
butterfly__mahi नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे . व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बेसनपीठामध्ये व्यक्ती गुलाबजाम टाकतो. मग त्याला मिक्स करुन तळतो. हे गुलाबजाम वडे (Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतायेत.
सोशलवर गोड गुलबजामूनच्या तिखट प्रतिक्रिया
अनेकांनी ही रेसिपी पाहून विचित्र कमेंट केल्या आहेत. अनेकांनी तर याचे (Viral Video) मीम्सही तयार केलेत. अशा विचित्र रेसिपी कोण खातं? असाही काहींनी प्रश्न केला आहे. हा व्हिडीओ काहीच वेळात ट्रेंड झाला.