Viral Video | ना घोडा ना गाडी, इलेक्ट्रिक स्कुटरवरून नाचत केली नवरदेवाने धमाकेदार एंट्री

Viral Video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video | सध्या लगीन सराई चालू आहे. त्यामुळे सगळीकडे लग्नाचे कार्यक्रम साखरपुडा, प्री वेडिंग, मेहंदी, हळद हे सगळे कार्यक्रम घराघरात चालू आहेत. परंतु सगळेजण आपल्या लग्नाचा दिवस कसा खास होईल याकडे लक्ष देत असतात. अनेक वेळा नवरदेव हा घोड्यावर किंवा सजवलेल्या फोर व्हीलरमध्ये लग्न मंडपात एन्ट्री करतो. परंतु सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवरदेव घोड्यावरून वरात घेऊन येण्याऐवजी इलेक्ट्रिक स्कूटर वरून वरात घेऊन येताना दिसत आहे.

हा व्हिडिओ (Viral Video) पिक बंगळुरूच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, वरातीसाठी नवरदेव घोड्याच्या जागी येथे इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन येत आहे. याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले दिसत आहे. या वरातीसाठी इलेक्ट्रिक स्कूटरला हार, फुल, तोरण लावून छान सजवण्यात देखील आलेले आहेत. त्याचप्रमाणे नवरदेवाच्या कुटुंबातील सगळ्या व्यक्ती हे फेटा घालून त्या स्कूटरभोवती नाचताना दिसत आहे. आणि फोटोग्राफर देखील फोटो काढताना दिसत आहेत.

इथर एनर्जीचे सीईओ आणि सहसंस्थापक तरुण मेहता यांनी या वरातीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. हा व्हिडिओ शेअर करून त्यांनी लिहिलेले आहे की, “हे गेल्या वीकेंडला घडलं दर्शनाला त्याची वरात येथे इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन जायचे होते आणि आम्ही त्याची वरात आणखी खास केली.”

रिझता ही एथर कंपनीची नवीन लॉन्च केलेली स्कूटर बाईक आहे. ही बाईक वरातीमध्ये सगळ्यांसाठी खास आकर्षण बनलेली आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होणार होत आहे. नेटकरी देखील या कल्पनेचे कौतुक करताना दिसत आहे.