Viral Video : भारतात जुगाडू लोकांची काही कमी नाही. त्यातही मोटारसायकल ,गाडी अशा बाबींमध्ये डोकं लावून काहीतरी नवीन केल्याचे आपण अनेकदा पहिले असेल असे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एक व्हिडीओ बद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये टेबल फॅनच्या मदतीने एका व्यक्तीने सायकलचे रूपांतर मोटारसायकल (Viral Video) मध्ये केले आहे. चला पाहूया नक्की काय आहे हा जुगाड ?
काय हे व्हिडीओ मध्ये ? (Viral Video)
सध्या आम्ही ज्या व्हिडीओ बद्दल बोलत आहोत तो व्हिडीओ नक्की कोणत्या भागातला आहे हे माहित नाही. मात्र व्हिडीओ मध्ये एक व्यक्ती थांबून या जुगाडू व्यक्तीला त्याच्या या अनोख्या सायकल बद्दल विचारत आहे. या सायकलीला मागच्या दोन्ही बाजूला दोन टेबल फॅन लावलेले दिसतात. या फॅनला बॅटरी जोडली आहे. याबद्दल माहिती देताना हा व्यक्ती सांगतो की जर एक फॅन चालू केला तर सायकलचे पायंडल मारायला लागत नाही. सायकल तशीच धावते. दोन्ही फॅन चालू केले तर जवळपास ७०-८० च्या स्पीडने पायंडेल न मारता ही सायकल धावते. त्यानंतर दुसरा व्यक्ती म्हणतो म्हणजे सायकल मोटरसायकलच्या (Viral Video) स्पीडने धावते.
पुढे दुसरा व्यक्ती विचारतो की, तुझं काही शिक्षण झालं आहे का ? तेव्हा सायकल चालवणारा हा जुगाडू व्यक्ती म्हणतो की नाही मी शिकलेलो नाही. तेव्हा दुसरा व्यक्ती म्हणतो की , एखाद्या इंजिनिअरला देखील सुचणार नाही असा जुगाड (Viral Video) तूम्ही केला आहे. तुम्ही जुगाडू आहात असे दुसरा व्यक्ती म्हणतो.
1.5 कोटींहून अधिक व्ह्यूज
@bapu_zamidar_short नावाच्या हँडल वरून हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ (Viral Video) पाहिल्यानंतर लोक विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले – ७०-८० च्या स्पीडवर ब्रेक कसे लावता? या व्हिडिओला १.५ कोटींहून अधिक व्ह्यूज आणि ४ लाख २६ हजार लाईक्स मिळाले आहेत.