सोलापूरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने काम सोडून भरचौकात केला मनसोक्त डान्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर शहरात पोलीस कर्मचाऱ्याचा एक डान्स व्हिडिओ (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये हा कर्मचारी आपले काम सोडून भरचौकात डान्स (Viral Video) करताना दिसत आहे. सदर पोलीस कर्मचाऱ्याचे राजेश पवार असे आहे. ते मंगळवेढा पोलीस ठाण्यात कर्मचारी म्हणून काम करतात. सोलापुरातील रहदारी असणाऱ्या रस्त्यावर राजेश पवार यांनी ऑन ड्युटी असताना मनसोक्त डान्स (Viral Video) केला आहे.

पोलीस कर्मचाऱ्याच्या डान्सचा व्हिडिओ (Viral Video) एका नागरिकाने आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केला आहे. यामुळे शहराची सुरक्षा ज्यांच्या हातात आहे तेच अशा पद्धतीने वागत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी कोणाकडे पहायचे असा प्रश्न सोलापूरकरांना पडला आहे. या कर्मचाऱ्याचा हा प्रताप पाहून नागरिकांनी सोलापूर शहर पोलीस दलाला याची माहिती दिली.

याची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी गंगामाई हॉस्पिटल येथे येऊन सदर पोलीस कर्मचाऱ्यास (Viral Video) ताब्यात घेऊन सदर बाजार पोलीस ठाण्यात घेऊन आले.पीएसआय डोंगरे यांनी या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे. आता पोलीस प्रशासन या कर्मचाऱ्यावर काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!