Viral Video : ऐकावं ते नवलंच!! लग्नाचं आमंत्रण म्हणून पाहुण्यांना दिलं चक्क ATM कार्ड; नक्की काय आहे प्रकार?

Viral Video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) प्रत्येकाला आपलं लग्न एकदम जोरदार आणि सगळ्यांच्या लक्षात राहील असं करायचं असतं. त्यामुळे जो तो काही ना काही हटके करायच्या तयारीत असतो. आजकाल बरेच लोक लग्नात डान्स करतात, वेगवेगळे कार्यक्रम ठेवतात, गेमसुद्धा ठेवतात. तर काही लोक आठवडाभर लग्नाचा जल्लोष करतात. लग्नाचा प्रत्येक क्षण अविस्मरणीय करण्यासाठी सगळेच मेहनत घेतात. त्यात लग्न पत्रिकांबद्दल बोलायचं झालं तर, आजचं युग डिजिटल आहे. त्यामुळे सगळी काम कशी आधुनिक पद्धतीने केली जातात.

अनेक लोक डिजिटल पत्रिका बनवतात आणि अगदी मोबाईलवरून आमंत्रण पाठवतात. कुणाच्या घरी जाऊन पत्रिका द्यायची गरज नाही. एका मिनिटांत आमंत्रण पोच होत. त्यामुळे बऱ्याच लोकांचा कल डिजिटल पत्रिकेकडे वळतो आहे. (Viral Video) हटके कपडे, हटके थीम, हटके एंट्री, हटके वरात यासोबत आता हटके लग्न पत्रिकेचा जमाना आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर ATM वेडींग कार्डची चर्चा रंगली आहे. होय. अगदी बरोबर वाचताय. ATM वेडिंग कार्ड. तुम्ही पाहिलीये का ही युनिक लग्नपत्रिका? नसेल पाहिली तर हा व्हिडीओ बघाच.

लग्नाचं आमंत्रण म्हणून नवरदेवाने वाटले ATM कार्ड

सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतात. पण हा व्हिडीओ (Viral Video) मात्र जरा हटके आहे. डिजिटल वेडिंग कार्ड हा आजचा ट्रेंड आहे. त्यात ATM वेडींग कार्डने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान, एका जोडप्याने आपल्या लग्नात चक्क एटीएम कार्ड वाट्ल्याचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय. पण हे ATM कार्ड नाही भाऊ!! वेडींग कार्ड आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

एका जोडप्याने आपल्या लग्नासाठी बनवलेली ही आगळी वेगळी ATM लग्नपत्रिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. ही लग्नपत्रिका एखाद्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डसारखी छापली आहे. या कार्डच्या एका बाजूला नवरदेव आणि वधूचं नाव, लग्नाची तारीख, वार आणि मुहूर्त लिहिला आहे.

तर दुसऱ्या बाजूला विवाहस्थळाची माहिती दिली आहे. (Viral Video) हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर itsallaboutcards नावाच्या हँडलवर शेअर करण्यात आला आहे. लोकांना हे वेडिंग कार्ड प्रचंड आवडतय. त्यामुळे हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे.