Viral Video | गॅस वाचवण्याची काकूंची निन्जा टेक्नीक, व्हिडिओ पाहून लावाल डोक्याला हात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video | आजकाल महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे प्रत्येकजण बचत करण्याचा प्रयत्न करत असतो. होणाऱ्या पगारांमध्ये पूर्ण महिन्याचा खर्च भागण्यासाठी अगदी छोट्या छोट्या गोष्टीत लोक बचत करत असतात. परंतु या सगळ्यात भारतीय महिला या बचत करण्यात सगळ्यात अव्वल स्थानी आहे अगदी कोथिंबीर घेण्यापासून ते घराच्या रेशनपर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये भारतीय महिला पैसे वाचवतात. याचे उदाहरण आपण आपल्या घरातच आपल्या आईच्या किंवा बहिणीच्या रूपात बघतच असतो. अशाच आता सोशल मीडियावर एका काकूंचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी एक नवीन जुगाड शोधून काढले आहे. या व्हिडिओमध्ये काकूंनी गॅसची बचत केलेली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात (Viral Video) व्हायरल होताना दिसत आहे.

काकूंनी अशी केली गॅसची बचत | Viral Video

सोशल मीडियावर व्हायरल होत असणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक महिला स्वयंपाक घरात जेवण बनवताना दिसत आहेत. त्यांनी त्यांच्या गॅसवर कुकर ठेवला आहे. आणि या कुकरमध्ये काहीतरी शिजायला ठेवलेले आहे. त्यानंतर त्या कुकरला झाकण न लावता त्यांनी त्या कुकरवर एक पॅन ठेवले आहे आणि त्यात तेल टाकले आहे. थोड्यावेळाने त्या पॅनमधील तेल गरम होते आणि त्या काकू त्या तेलात पुऱ्या तळतात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे.

हा व्हिडिओ (Viral Video) लोकांना खूप आवडत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 3 लाख 12 हजारांपेक्षा अधिक लाईक आलेले आहेत. तसेच अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करत आहे. एकाने या व्हिडिओवर कमेंट केली आहे की, “अहो काकू इतकी ही बचत करू नका.” आणखी एकाने कमेंट केली आहे की, “काकू कूकरच्या स्पोट झाला तर तुमचे काय होईल काकू” अशा वेगवेगळ्या पद्धतीने लोक त्या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. काही लोकांना हा जुगाड खूपच आवडलेला आहे परंतु काहीजण या जुगाड्याला जीवघेणे म्हणत आहे. कारण काही झाले तर त्यामुळे काकूंचा जीव धोक्यात येऊ शकतो.