Viral Video | उष्णतेपासून वाचण्यासाठी ऑटोचालकाने केले नवीन जुगाड, पाहिल्यानंतर तुम्हीही कराल सलाम

Viral Video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Viral Video सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकजण त्यांचे कलागुण सादर करतात, तर काही व्हिडिओ मात्र असे असतात की, जे पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटते. असे काही जुगाडाचे व्हिडिओ असतात. अशातच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. तो पाहून अनेक लोक या व्यक्तीचे कौतुक करताना दिसत आहे.

सध्या उन्हाळा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. कडाक्याच्या या उन्हामध्ये रस्त्यावरून चालताना देखील खूप त्रास होत आहे. अगदी उन्हाचे बाहेर पडणे देखील आता कठीण झालेले आहे. परंतु जर या उन्हाळ्यात आपल्याला प्रवास करायचा असेल, तर त्याहून अधिक त्रास सहन करावा लागतो. कारण गाडीमध्ये उन्हाच्या झळया जास्त प्रमाणात लागतात. काही वाहनांमध्ये एसी असतो. परंतु ज्या छोट्या ऑटोरिक्षा असतात, त्याच्यात मात्र एसी नसतो. सध्या अशाच एका ऑटो चालकाचा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याने उष्णतेपासून बचाव करण्यासाठी एक अनोखी आयडिया शोधून काढली आहे. सोशल मीडियावर या व्यक्तीचे मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसत आहे.

ऑटोचे छत हे लोखंडाचे असल्याने त्यावर रबर सीट बसलेली असते. त्यामुळे जेव्हा यावर उष्ण सूर्यप्रकाश पडतो.यामुळे ते अधिक गरम होते आणि आत बसलेल्या व्यक्तीला जास्त गरम होते. परंतु या ऑटोमध्ये उष्णतेपासून बचाव करण्यासाठी त्या व्यक्तीने गाडीचे छत आणि मागील भाग हा गवताने झाकून टाकलेला आहे. त्यामुळे ऑटोवर सूर्यप्रकाश पडला, तरी त्याचा परिणाम होत नाही. आणि आज जास्त गरम होत नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. अनेक लोकांना त्याचे एक जुगाड आवडलेले आहे.

व्हायरल होत (Viral Video) असलेला हा व्हिडिओ @pooran_dumka नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ज्याला आतापर्यंत 6 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. यावर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की, ‘फक्त गायीला शेळीपासून वाचवा.’ आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘सात तोफांची सलामी भाई, हे फक्त भारतातच शक्य आहे.’ दुसऱ्या युजरने लिहिले आहे, ‘मुव्हिंग मिनी एसी.’