हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आजचं जग हे आधुनिक जग आहे. त्यामुळे डिजिटल नेटवर्कचा विस्तार वाढतच चालला आहे. सोशल कनेक्टिव्हीटी साठी आजकाल जो तो सोशल मीडियावर सक्रिय आहे. त्यामुळे एखादा व्हिडीओ व्हायरल झाला कि मग अख्ख सोशल मीडिया व्यापून टाकतो. असे अनेक भन्नाट व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. अशाच एका चिमुकल्या बाळाचा गोड व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओतील बाळाचा आणि त्याच्या वडिलांचा संवाद फारच मजेशीर आणि नेटकऱ्यांना भुरळ घालणारा ठरला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ ओवी नायक या इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला आहे. हा एका चिमुकल्या मुलीचा आणि तिच्या वडिलांचा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये वडील अंगाई गाऊन त्यांच्या लेकीला झोपवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्या मुलीला काही झोप येईना आणि ती काय झोपेना. (Viral Video) हा व्हिडीओ गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्याला आतापर्यंत १० मिलियन पेक्षाही जास्त नेटकऱ्यांनी पाहिला आहे. तर ५ लाखांहून जास्त लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे आणि ३ हजाराहून अधिक लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत.
हा व्हिडीओ ओवी नायक या चिमुकल्या मुलीचा आहे. ज्यामध्ये ओवीचे बाबा तिला मांडीवर घेऊन अंगाई गात झोपवण्याचा प्रयत्न करत आहेत. (Viral Video) ओवीचे बाबा म्हणतात कि, ‘तू डोळे झाक मी गाणं म्हणतो’. त्यानंतर ओवीचे बाबा ‘निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई, आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही’, हे अंगाईगीत गाऊ लागतात. यावर मध्येच डोळे उघडून ओवी, ‘नाही झोपला…’ असे म्हणते. यावर तिचे वडील म्हणतात, ‘नको झोपू दे… पण मला गाणं म्हणू दे’. पुढे परत ते अंगाई गाऊ लागतात. मग पुन्हा ओवी म्हणते..’ चंद्र नाही झोपला’. मग तिचे वडील तिला हलकेच रागावत म्हणतात, ‘नाही झोपला ना चंद्र..? नको झोपू दे पण तू झोप…’.