Viral Video | शेतकऱ्याने पक्षांसाठी केला ‘हा’ देसी जुगाड, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video | आजकाल शेतात आणि पक्षी आणि प्राणी येतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला मोठ्या प्रमाणात हानी मिळते. यासाठी शेतकरी त्यांच्या शेतामध्ये अनेक विविध यंत्र बसवतात जेणेकरून त्यांच्या शेतीचे काही नुकसान होणार नाही. किंवा शेतकरी स्वतः थांबून ते पक्षी आणि प्राणी हाकलून लावतात.

पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शेतकरी एक नवीन जुगाड करून शेतातील त्याच्या पक्षांना हाकलवत आहे. शेतकऱ्यांनी ही एक नवीन युक्ती शोधून काढलेली आहे ज्यामुळे शेतकऱ्याचे श्रम देखील वाचते आणि त्यांच्या पिकांना देखील नुकसान होत नाही.

हेही वाचा – Chhatrapati Sambhaji Maharaj Statue : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात उभारणार संभाजी महाराजांचा सर्वांत उंच पुतळा

एका शेतकऱ्याने कागदाचा पंखा बनवलेला आहे. तो एका मोठ्या काठीला लावलेला आहे. आणि त्या पंख्याला मागे चमचा लावलेला आहे . त्याचप्रमाणे त्याच काठीला त्यांनी एक परात जोडलेली आहे. हवा आला की तो पंखा फिरतो आणि तो चमचा त्या परातीवर सारखा पडतो आणि या आवाजाने त्यांच्या या शेतामध्ये कोणत्याही प्रकारची पाखर येत नाही.

शेतकऱ्याचा हा देसी जुगाड पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. आणि अनेक शेतकरी या व्हिडिओमध्ये पाहून अशा प्रकारचे देसी जुगाड करण्याचा विचार करत आहे.