Viral Video | दोन्ही हात नसतानाही पट्ठ्याने चालवली गाडी, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

Viral Video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video | असं म्हणतात जर माणसांमध्ये इच्छा शक्ती आणि जिद्द असेल तर तो कुठलीही गोष्ट साध्य करू शकतो. तुम्ही तुमच्या हिमतीने या जगात कुठलीही गोष्ट करू शकता. जर तुमच्या एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल आणि ध्येय असेल, तर तुम्ही शारीरिक दुर्बलता असो किंवा आर्थिक परिस्थिती असो सगळ्यावर तुम्ही मात करू शकता. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. त्या व्हिडिओमध्ये तो व्यक्ती त्याच्या इच्छाशक्तीच्या माध्यमातून असे काही करत आहे. जे पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीचे दोन्ही हात नाही आणि तो मोटरसायकलवरून जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ (Viral Video) पाहून अनेकजण आश्चर्यचकित होत आहेत. आणि त्या व्यक्तीचे कौतुकही होत आहे.

या व्हिडिओमध्ये तो व्यक्ती दोन्ही हात नसतानाही खूप मेहनतीने आणि समर्पण करून मोटरसायकल चालवताना दिसत आहे. त्या व्यक्तीने त्याच्या हातात लोखंडाचा रोड धरला आहे. बाईकचाक्लच आणि एक्सीलेटरवर ठेवल्यानंतर तो त्याच्या मागे बसलेल्या दोन लोकांसह अत्यंत योग्य पद्धतीने गाडी चालवताना दिसत आहे. त्याचे हे गाडी चालवणे पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का पाहिला आहे. अनेकजण त्या व्यक्तीचे सोशल मीडियावर कौतुक करत आहे. त्याचा हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/reel/C4a20qEIzO2/?utm_source=ig_embed&ig_rid=30ee0e83-32e0-4df9-bfc1-596390f6e83c

हा व्हिडिओ instagram शेअर करण्यात आलेला आहे. तो आत्तापर्यंत 1 लाख 50 हजारांपेक्षा अधिक लोकांनी पाहिलेला आहे. त्याचप्रमाणे या व्हिडिओला हजारो लाईक देखील आलेले आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांची प्रतिक्रिया देत आहे. एका युजरने लिहिले आहे की, “इच्छा आणि समर्पण असेल तर या जगात काहीही अशक्य नाही. दुसऱ्या एका युजरने लिहिलेले आहे की, “भावाला सलाम” तर अजून केले एका युजरने लिहिले आहे की, “बाईकवर 3 लोकांना बसवणे बेकायदेशीर आहे. अशा अनेक प्रकारे त्याच्या या व्हिडिओवर लोक कमेंट करत आहेत.