Viral Video : नशिबाची थट्टा!! परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या लहानग्याचा व्हिडीओ VIRAL; शत्रूवरही येऊ नये अशी वेळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आपल्या देशात शिक्षणासाठी मोठमोठ्या शाळा, इन्स्टिट्यूट, अकॅडेमी आणि युनिव्हर्सिटी आहेत. इथे पुस्तकातलं सगळं शिकवलं जातं. पण नशीबासोबत डील कसं करायचं? हे गरिबीचं शिकवते. सोशल मीडियावर एका लहान मुलाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जो पाहून अशी वेळ शत्रूवरही येऊ नये अशी प्रार्थना करावीशी वाटेल.ज्याच्याकडे सगळं असतं त्याला मिळालेल्या सगळ्याची किंमत असेलचं असे नाही सांगता येत. पण ज्याच्याकडे काहीच नसतं त्याच्याकडे काहीतरी असल्याचा आनंद असतो हे अनेकदा निदर्शनास आले आहे.

सोशल मीडियावर एका लहान मुलाचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. (Viral Video) ज्यामध्ये हा मुलगा एकीकडे वह्या- पुस्तकं घेऊन अभ्यास करत बसलाय. तर दुसरीकडे हा मुलगा तव्यावर भाकरीसुद्धा भाजताना दिसतोय. इतक्या लहान वयात या मुलावर नशिबाने अशी वेळ आणली आहे. या व्हिडिओतील मुलाच्या हाताला चटका देखील लागताना दिसतोय. आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेत हा मुलगा एकावेळी दोन जबाबदाऱ्या पार पाडतोय. हे पाहून नेटकरी त्याचे कौतुक करत आहेत आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करत आहेत.

पण मुळात हा व्हिडीओ फेक आहे. कारण, या व्हिडिओतील मुलगा साधारण सहावी, सातवीत असणे अपेक्षित आहे. मात्र त्याच्यासमोर ठेवलेली पुस्तकं MPSC- UPSC अभ्यासक्रमाची आहेत. शिवाय नीट पाहिले तर लक्षात येईल कि, ज्या तव्यावर हा मुलगा भाकऱ्या भाजतोय. ती चूल विझवलेली आहे. (Viral Video) हा व्हिडीओ सोशल मीडिया इंस्टाग्राम dream__upsc24 या हॅण्डलवर शेअर करण्यात आला आहे. यावर लिहिलंय, ‘कुछ इस तरह जिद करना सीखो की, जो लिखा ही नही इस मुकद्दर में इसे भी हासिल करना सीखो। संघर्ष ही जीवन है मेरे दोस्त।’ हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय आणि नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

(Viral Video)सांगायची बाब अशी कि, सोशल मीडियावर केवळ प्रसिद्धीसाठी असे खोटे व्हिडीओ बनवून शेअर केले जातात. पण या व्हिडिओतील खोटेपणा कुणाच्या तरी आयुष्याचे दुर्दैवी वास्तव आहे. देशात अनेक गरीब असे आहेत जे आजही आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊ शकत नाहीत. अनेक विद्यार्थी असे आहेत जे केवळ घरगुती आर्थिक तणावामुळे शाळा सोडून देतात. आजही शिक्षणाला वंचित राहणारी बरीच मुलं आहेत. ज्यांच्या आयुष्यात खरोखर असे प्रसंग घडतात. त्यामुळे व्हिडीओ खोटा असला तरीही परिस्थिती खोटी नाही हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.