Viral Video | टाकाऊ बसपासून बनवले चालते फिरते कँटीन, लोकांनां अशी दिले जाते जेवणाची सर्व्हिस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video | आपण अनेकवेळा आपल्या वापरून झालेल्या गोष्टींचे पुनर्वापर करत असतो. म्हणजे अनेकवेळा आपण दुकानातून प्लास्टिकच्या बाटल्या विकत घेतो आणि त्या बाटल्यांचा वापर घरी जाऊन आपण झाडे लावण्यासाठी करतो. यामुळे आपल्या पर्यावरणाची हानी होण्यापासून वाचतेआणि वस्तू कुठेही न पडता त्याचा चांगला वापर होतो. म्हणजेच कचरा कमी करण्यासाठी रिसायकलिंग हे एक चांगली महत्त्वाची गोष्ट आहे.

आजकाल अनेक अशा गोष्टी आहेत ज्याचा लोक पुनर्वापर करत आहे. आणि याचेच एक उदाहरण आता सोशल मीडियावर पाहायला मिळते. नुकता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे यामध्ये पाहायला मिळते की, बंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन यांच्या कर्मचाऱ्यांनी एका जुन्या आणि टाकाऊ बसचे रूपांतर एका कॅन्टीनमध्ये केलेले आहे आणि हे चालते फिरते कॅन्टीन बसच्या माध्यमातून त्यांनी तयार केलेले आहेत.

या बसचे कॅन्टीनमध्ये रूपांतर होण्यापूर्वी या बसने आत्तापर्यंत 10 लाख 64 हजार 298 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. तसेच कँटीनमध्ये रूपांतर करण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी देखील त्याला मदत केलेली आहे. हे चालते फिरते कँटीन लोकांसाठी खूप फायदेशीर झालेले आहे. या ठिकाणी सकाळचा नाश्ता, दुपारच्या जेवणाची सुविधा देखील उपलब्ध आहे. तसेच काहीतरी वेगळे असल्याने या बसकडे सगळे लोक आकर्षित होतात आणि त्यांनाही या स्वरूपाची बस खूप आवडलेली आहे.

https://www.instagram.com/reel/C3poV3YrTVa/?utm_source=ig_embed&ig_rid=d7a977d7-4767-4638-99ed-75afc290c7df

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कॅन्टीनच्या व्हेंटिलेशन तसेच लाइटिंगची सिस्टीम देखील खूप चांगली केलेली आहे. त्यामध्ये खुर्च्या, टेबल, पंखा तसेच वॉश बेसिन यांसारख्या सुविधा देखील उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याची देखील सोय आहे. त्याचप्रमाणे या बसच्या छतावर खिडक्या लावण्यात आलेल्या आहेत. या गोष्टींमुळे या बसकडे लोक खूप आकर्षित होतात आणि लोकांना खूप चांगले आणि जेवण देखील जेवायला मिळते.

निकामी असलेल्या बसमधून हे चालते फिरते कॅन्टीन केल्यामुळे त्या लोकांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. त्याचप्रमाणे नेटकरांना देखील हा व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट आणि लाईकचा वर्षाव करत आहे.