Viral Video | काही दिवसांपूर्वी आईस्क्रीममध्ये माणसाचे बोट सापडल्याची धक्कादायक बातमी समोर आली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला होता. आणि त्यानंतर लोकांना बाहेरून काही ऑर्डर करताना खूपच भीती वाटायला लागलेली आहे. आता अशाच प्रकारची एक बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता अमूल कंपनीच्या आईस्क्रीमच्या डब्यामध्ये चक्क गोम सापडल्याचा प्रकार समोर आलेला आहे. एका महिलेने हा दावा केला आहे आणि याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
आईस्क्रीममध्ये सापडली गोम | Viral Video
ही घटना नोएडामध्ये घडलेली आहे. आईस्क्रीमच्या डब्यामध्ये आता गोम सापडल्याची घटना आलेली आहे. सेक्टर 12 मध्ये राहणाऱ्या दीपा नावाच्या व्यक्तीने शनिवारी सकाळी ऑनलाईन डिलिव्हरी अमूलचे आईस्क्रीम ऑनलाईन ऑर्डर केले होते. या महिलेने असे सांगितलेले आहे की, तिने जेव्हा आईस्क्रीमचा डबा उघडला, तेव्हा त्यात तिला एक गोम सापडली आणि या घटनेचा व्हिडिओ देखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
कंपनीवर मोठा आरोप
आईस्क्रीमच्या डब्यांमध्ये गोम सापडल्यामुळे तिच्या संपूर्ण कुटुंबालाच धक्का बसल्या असल्याचे तिने सांगितलेले आहे. महिलेने केलेल्या या दाव्यामुळे आता अमूलच्या गुणवत्तेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आता लोकांना ऑनलाइन ऑर्डर करताना भीती वाटत आहे.
अमूल ही भारतातील एक नामांकित कंपनी आहे. या कंपनीचे अनेक उत्पादने देशभर वापरले जातात. दूध, दही, चीज, लोणी आणि आईस्क्रीम यांसारखे उत्पादनासाठी अमूल खूप लोकप्रिय आहे. परंतु या महिलेने आता दावा केल्यानंतर त्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे. या महिलेने सांगितले आहे की, अमूल सारखी मोठी कंपनी त्यांच्या उत्पादनांच्या गुणवत्तेकडे लक्ष देत नसेल, तर आपण कोणत्या ब्रँडवर विश्वास ठेवायचा. या व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजलेली आहे.