Viral Video | एकही रुपया खर्च न करता शेतकऱ्याने केले पेरणी यंत्र तयार, एकदा पाहाच हे देसी जुगाड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video | आपला देश हा कृषिप्रधान देश मानला जातो. परंतु आपल्या येथील शेतकऱ्याला शेतीत धान्य पिकवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. कष्टाचे काम करावे लागते. आजकाल अनेक यंत्रे आलेली आहेत. परंतु सगळ्यात लोकांनाही यंत्र खरेदी करणे जमत नाही. त्यामुळे त्यांना शारीरिक कष्टाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो. परंतु आपल्या देशात असे काही अवलिया शेतकरी आहेत. जे नवनवीन गोष्टींचा शोध लावत असतात. जेणेकरून त्यांचे शारीरिक कष्ट कमी होते आणि काम देखील पूर्ण होते.

आज आपण अशीच एक बातमी पाहणार आहोत ती म्हणजे एका शेतकऱ्याने एकही रुपया न खर्च करता घरी तीळ पेरणी यंत्र तयार केलेले आहे. त्याची ही कहाणी आता संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेली आहे. तर या शेतकऱ्याने नक्की कोणती देसी जुगाड केला आहे आपण पाहणार आहोत.

बाबुळगाव आतील सुरेंद्र चित्ते यांनी हे पेरणी यंत्र चालू तयार केले आहे. या शेतकऱ्याने बिस्लरिच्या सात-आठ बाटल्या आणल्या आणि त्यांना आडव्या करून त्यांना छिद्रे पडले. त्याचप्रमाणे त्या बाटल्या आडव्या फेकल्यावर त्या क्षेत्रातून हळूहळू दाणे खाली पडायला लागले. त्यानंतर त्यांनी त्या बाटलीमध्ये एक तार घातली.

परंतु बाटलीमध्ये हे काम खूप हळू व्हायला लागले त्यानंतर त्यांनी एक मोठी बरणी घेतली. आणि त्या प्लॅस्टिकच्या बरणीला खालून छिद्र पडली. आणि त्यातून एक यंत्र बनवले आणि त्यात त्यांनी तीळ टाकून जवळपास एक ते दीड एकरला या यंत्राने तीळ पेरणी केलेली आहे.

या शेतकऱ्यांनी अत्यंत टाकाऊ पदार्थांपासून हे यंत्र तयार केलेले आहे. त्यामुळे तिथल्या परिसरात त्याची खूप चर्चा चालू आहे. पहिली गोष्ट म्हणजे यासाठी कोणताही खर्च आला नाही. आणि शेतकऱ्यांचे पैसे आणि वेळ देखील वाचत आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक चाललेले आहे.

त्याने एक बांबू घेऊन त्या बांबूला दोन समान भागात विभागले आहे. त्याचप्रमाणे त्या प्लास्टिकच्या बरणीला त्यांनी बारा लहान लहान छिद्र पडलेली आहेत. त्यानंतर त्यांनी त्यात तीळ टाकले. आणि एका खताच्या पिशवीला जर्मन तार बांधली. हे यंत्र तयार केले त्या यंत्राने मुळा, मोहरी तसेच गवार यांसारखी पिकं देखील पेरली जाऊ शकतात.

ते काम करत असताना एका व्यक्तीने त्यांचा व्हिडिओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर त्यांचा हा व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात वायरल झाला. आणि आता त्याची दखल अनेक लोक देखील घेत आहे. आणि त्यांच्याप्रमाणे पेरणी करण्याची लोक तयारी दाखवत आहेत.