हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आपलं लग्न इतरांपेक्षा हटके आणि वेगळं व्हावं असं प्रत्येक जोडप्याला वाटतं. त्यामुळे लग्नात काहीतरी आकर्षक आणि लक्षवेधी प्रयोग करण्याकडे सर्वांचा विशेष प्रयत्न असतो. त्यामुळे लग्नासाठी अशा काही गोष्टी प्लॅन केल्या जातात ज्या फक्त नवरा- नवरी नव्हे तर लग्नाला उपस्थित असलेल्या प्रत्येकाला एक आठवण देऊन जातात. सोशल मीडियावर अशा लग्नांतील अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. असाच एका लग्नातील व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
सोशल मिडीया ट्विटरवर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एका ख्रिश्चन वेडींगचा आहे. या व्हिडिओत आपण पाहू शकतो कि, एक कपल फायर वेडिंग ड्रेसमध्ये एंट्री घेताना दिसत आहे. त्यांच्या कपड्यांना लागलेली आग या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. व्हिडिओत दिसणारे दृश्य अगदी थरकाप उडवणारे आहे. (Viral Video) मात्र हे जोडपं आनंदात हा स्टंट करताना दिसत आहे. मुख्य बाब अशी कि, या जोडप्याने हा फायर स्टंट प्रोफेशनल्सच्या निदर्शनाखाली केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडीओसोबत हे स्पष्ट करण्यात आले आहे कि, हे नवरा- नवरी दोघेही स्टंट एक्टर आहे. त्यामुळे पूर्ण सतर्क राहून आणि प्रोटेक्शन वापरुन त्यांनी आपल्या लग्नात हा फायर स्टंट केला आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी आवर्जून सांगितले आहे कि, ‘तुम्ही असा स्टंट करु नका जीवासोबत खेळ होऊ शकतो’. (Viral Video) हा व्हिडीओ crazyclipsonly नावाच्या X अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अत्यंत भयानक असा हा स्टंट व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतो आहे. फक्त १६ सेकंदात हा व्हिडीओ काळजाची धडधड वाढवतो आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कुणीही असा स्टंट करण्याची हिंमतसुद्धा करायचा विचार करणार नाही. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी या कपलच्या फायर स्टंटबाबत प्रतिक्रिया देताना ‘जीवाशी खेळ करत आहेत.. हे चूक आहे’, ‘अशा व्हिडिओतून नको त्या स्टंटबाजीसाठी प्रोत्साहन मिळत आहे’ असे म्हटले आहे. दरम्यान, असे बरेच स्टंटबाजीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात आणि चर्चेचा विषय देखील बनताना दिसतात. मात्र अशा स्टंटबाजीला बळी न पडणे, यातच शहाणपण आहे. (Viral Video)