Viral Video : भारी हुश्शार!! हॉस्टेल बॉईजने कुलरलाच बनवलं फ्रिज; जुगाड पाहून व्हाल अवाक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर बरेच वेगवेगळे व्हिडीओ, फोटो आणि घटना व्हायरल होत असतात. आपल्या देशात एखाद्या गोष्टीच आकर्षण तयार झालं की, सगळेच एका नादाला लागतात. असंच काहीस सोशल मीडियाच्या बाबतीत झालं आहे. पण सोशल मीडियावर व्हायरल होणारे सगळेच व्हिडीओ, फोटो वायफळ नसतात हे ही तितकंच खरं!! आपल्या देशात अनेक लोक आजची वेळ काढण्यासाठी काही ना काही जुगाड करताना दिसतात. हे जुगाड करण्याची त्यांची अद्वितीय प्रतिभा खरोखरच सलाम करण्यासारखी असते.

आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जुगाड करण्यात हे लोक जितके माहिर असतात तितके इतर कुणी क्वचितच असतील. अनेक सामान्य कुटुंबातील मुलं शिक्षणासाठी बाहेरगावी हॉस्टेलमध्ये राहत असतात. याठिकाणी त्यांच्या सगळ्याच गरजा पूर्ण होतील असे नाही. (Viral Video) मग अशावेळी ही मुलं अशी काही शक्कल लढवतात की, हैराण व्हायला होतं. आताही सोशल मीडियावर अशाच एका जुगाडचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये प्रयागराजच्या काही विद्यार्थ्यांनी हॉस्टेलमध्ये अगदी कमी संसाधनांमध्ये कुलरपासून फ्रिज बनवल्याचे दिसत आहे.

कुलरलाचं बनवलं फ्रिज (Viral Video)

सध्या बऱ्याच भागांमध्ये मान्सूनने हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी अजूनही लोक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, उष्णतेने हैराण झालेल्या प्रयागराजमधील हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी मिळून कुलरला फ्रिजचे रूप दिले आहे. गरमीमुळे अन्नपदार्थ लवकर खराब होतात आणि त्यामुळे या मुलांनी फळे, दही खरेदी केल्यानंतर ते खराब होऊ नये म्हणून हा जुगाड केला आहे.



एकीकडे आपल्यासारखे सर्वसामान्य लोक कूलरचा वापर थंड हवा घेण्यासाठी करतात. (Viral Video)तर दुसरीकडे या मुलांनी कुलरचा फ्रिज म्हणून वापर केल्याचे दिसत आहे. या व्हिडिओत आपण पाहू शकतो की, मुलांनी या कूलरमध्ये फळे आणि भाज्या ठेवले आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर its_rohit_yadav नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ अनेकांनी पाहिला असून या जुगाडला सलाम केला आहे. तर अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करताना ‘हे अत्यंत धोकादायक आहे’, ‘अरे यातून शॉक लागू शकतो.. असं काही करू नका’ असे म्हटले आहे. (Viral Video) तर काही नेटकऱ्यांनी ‘आमच्या हॉस्टेल डेज मध्ये आम्हाला नाही सुचलं यार.. मस्त जुगाड आहे’ अशा कमेंट केल्या आहेत.