Viral Video : धान्याच्या गोणीपासून तयार केला कुर्ता सेट; तरुणाच्या गजब स्टाईलने हलवलं उर्फीचं फॅशन मार्केट

Viral Video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) मार्केट मध्ये रोज नवनवीन फॅशन येत असतात. बदलत्या ट्रेंडनुसार फॅशन बदलते. त्यामुळे लोकांनासुद्धा सतत काहीतरी नवीन हवं असत. बाजारात तेच तेच डिझाइन्सचे कपडे पाहून आपोआप बोरिंग वाटू लागत. मग पुन्हा खप वाढवायचा झाला की नव्या डिझाईन आणि नव्या कलर कॉम्बिनेशनचे कपडे शॉपिंग विंडोवर लावून ग्राहकांचे लक्ष वेधले जाते. त्यात जवळपास सण असतील तर मग नवनवीन स्टाईलचे कपडे हमखास उपलब्ध असतात. यात अगदी ट्रॅडिशनल पासून ते इंडोवेस्टर्न पर्यंत सगळे प्रकार पहायला मिळतात.

आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या ढंगाचे, रंगाचे, विविध प्रकारचे धागे आणि कापड वापरून तयार केलेले कपडे परिधान केले असतील. पण तुम्ही गोणीपासून शिवलेला कुर्ता पायजमा कधी ट्राय केलाय? वाचून जरा वेगळं वाटलं असेल. पण सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ (Viral Video) पाहिल्यानंतर तुमचा पक्का विश्वास बसेल की, गोणीपासून सुद्धा कपडे तयार केले जाऊ शकतात. कारण या व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणाने एका गोणीपासून कुर्ता पायजमा तयार केल्याचे दिसत आहे.

गोणीपासून बनवला पारंपारिक पोशाख (Viral Video)

या तरुणाने बनवलेला हा ट्रॅडिशनल आऊटफिट इतर कपड्यांपेक्षा जितका वेगळा तितकाच आकर्षक देखील आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ एका दुकानातील आहे. ज्यात एका तरुणाच्या हातात आधी गोणी दिसते. यानंतर त्याच गोणीपासून तयार केलेला आकर्षक कुर्ता आणि पायजमा घालून तरुण समोर येतो.



ज्या गोणीमध्ये धान्याचा साठा केला जातो ती गोणी कुणी कपडे म्हणून वापरू शकेल असा विचारही कुणी केला नसेल. आता उर्फी जावेद या सगळ्याला अपवाद आहे ती वेगळी गोष्ट.

या व्हिडीओत गोणीपासून तयार केलेला कुर्ता सेट दाखवण्यात आला आहे. या कुर्त्याला कॉलर, बटणं आणि मॅचिंग पायजम्यामूळे आणखीच लूक येतोय. पारंपरिक पोशाखाचा अपमान न करता काहीतरी वेगळी कल्पना वापरल्याचा हा उत्तम नमुना सादर करण्यात आला आहे. (Viral Video) सोशल मीडिया इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ fashiongalaxy123 नावाच्या हँडलवर शेअर करण्यात आला आहे. ज्यावर अनेक नेटकऱ्यांनी विविध कमेंट करत कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर काहींनी मात्र उर्फी जावेदसोबत तुलना करण्याची बरोबर संधी साधली आहे.

उर्फी जावेदला टक्कर

विचित्र किंवा वेगळ्या फॅशनचा विषय असेल तर उर्फी जावेदच्या नावाचा उल्लेख होतोच. या तरुणाने बनवलेलं गोणीपासूनचा कुर्ता पायजमा अनेक नेटकऱ्यांनी पसंत केला आहे. तर अनेकांना ही वेगळी फॅशन पाहून उर्फी जावेदची आठवण झाली. अनेकांनी कमेंट करताना उर्फीच्या नावाचा उल्लेख केला आहे. (Viral Video) एका नेटकऱ्याने तर या तरुणाला ‘उर्फीचं मेल व्हर्जन’ म्हटलं आहे. तर आणखी एकाने म्हटलं, ‘उर्फी जावेदचा छोटा भाऊ सापडला.. बुर्फी जावेद’. अन्य एकाने लिहिले, ‘हा गोणी मॅन उर्फी जावेदचं मार्केट डाऊन करणार वाटत..’