Viral Video | जुगाड करून पठ्ठ्याने बनवली अनोखी गाडी; व्हिडीओ पाहून व्हाल अवाक्

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video | सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये लोक आपली नवीन कलाकृती दाखवत असतात. आपल्या भारतात जुगाड करणाऱ्या लोकांची काही कमतरता नाही. लोक असे जुगाड करतात की, एखाद्या इंजिनियरला देखील लाज वाटेल. सोशल मीडियावर विनोदी तसेच जुगाड यांनी भरलेले अनेक व्हिडिओ आहेत. काही व्हिडिओ आपल्याला आपले मनोरंजन करतात. तर काही व्हिडिओमधून आपल्याला नवीन नवीन टेक्निक समजतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

याआधी तुम्ही जुगाड करण्याचे वेगवेगळे व्हिडिओ (Viral Video) पाहिले असेल. परंतु हा एक खतरनाक जुगाड समोर आलेला आहे. ती म्हणते म्हणजे एका तरुणाने खराब झालेल्या बाईकला सायकलची चाके लावलेली आहे. आणि नवीन बाईक तयार केलेली आहे. तो या बायकला बाईकला पेंडल मारून रस्त्यावर बाईक चालवताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसायला देखील येत आहे. परंतु या व्यक्तीने चांगलेच डोके वापरून ही नवीन अशी बाईक तयार केलेली आहे.

हा तरुण ग्रामीण भागातील दिसत आहे. त्याने त्याच्या जुगाडी आयडियाच्या मदतीने ही अनोखी मोटरसायकल तयार केलेली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. ही गाडी चालवण्यासाठी कोणत्याही इंधनाची गरज नाही. एक जुनी बाईक पडलेली असते. त्या बाईकला पेंडल आणि चैन जोडली आहे. आणि बाईक पेंडल मारत तो गाडी चालवत आहे. तरुणाने भंगारात पडलेल्या सगळ्या वस्तूंचा आणि बाईकचा चांगलाच वापर केलेला आहे. त्यामुळे अनेक लोक सोशल मीडियावर त्याचे कौतुक देखील करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंत केलेला जात आहे.