Viral Video : मी पाहिले तुझ्या..!! नाशिकच्या आजोबांचा दिलखुलास डान्स; एनर्जी पाहून तरुणही लाजतील

Viral Video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर कायम एकापेक्षा एक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अगदी लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सगळेच काही ना काही अतरंगी व्हिडिओ बनवत असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये बरेच व्हिडीओ डान्सचे असतात. सध्या असाच एक बिनधास्त डान्स व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये एक आजोबा आपल्या मित्रमंडळींसोबत अगदी दिलखुलासपणे थिरकताना दिसत आहेत. त्यांचा हा डान्स आणि चैतन्य पाहून कुणालाही ऊर्जा येईल, यात शंका नाही.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

या व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, एक आजोबा आपल्या बाकी मित्रांसोबत डान्स करण्याचा आनंद लुटत आहेत. आजूबाजूला असणारी अनेक वयोवृद्ध मंडळी पाहून हा एखादा ग्रुप असावा असे लक्षात येते. खुल्या मैदानात आजोबांनी दिल खोलून केलेला हा डान्स सोशल मीडियावर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Vijay Kharote (@kharotevijay)

(Viral Video) हे आजोबा नाचत असताना त्यांच्या आजूबाजूला असणारी इतर मंडळी त्यांना प्रचंड प्रोत्साहन देत आहेत. या व्हिडिओतील आजोबा ‘मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतून..’ या गाण्यावर मस्त थिरकताना दिसत आहेत. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव अत्यंत कमालीचे व तरुणांनाही लाजवणारे आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सोशल मीडिया इंस्टाग्रामवर kharatevijay नावाच्या हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतून..’ असे लिहिलेले आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत अनेक लोकांनी पाहिला असून यावर प्रतिक्रिया देत युजर्स आजोबांच्या उत्साहाला दाद देत आहेत.

व्हिडिओवर हार्ट इमोजी आणि फायर इमोजींचा तर पाऊस पडतोय. (Viral Video) एका नेटकऱ्याने कमेंट बॉक्समध्ये लिहिलंय, ‘वा काय छान नाचताय सगळे कुठे असता मी नक्की भेट घेईन तुमची सगळ्यांची तुमच्या सगळ्यांकडे पाहून मला ऊर्जा मिळाली’. अन्य एकाने म्हटलंय, ‘जीवनाचं आनंद कसा घ्यायचा हे आपल्याकडून शिकण्यासारखे आहे’.

व्हिडीओ क्रिएटर नाशिककर आजोबा

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत जे आजोबा दिसत आहेत ते इंस्टाग्रामवर फार सक्रिय असतात. ते एक व्हिडिओ क्रिएटर असून त्यांचे नाव विजय खरोटे असे आहे. सोशल मीडियावर त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. हे आजोबा नाशिकच्या सिडको येथील रहिवासी आहेत. (Viral Video) ते कायम इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या गाण्यांवरील डान्सचे व्हिडिओ आणि रिल्स शेअर करत असतात. त्यांचे व्हिडीओ हे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. आतापर्यंत त्यांनी शेअर केलेले बरेच व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यांपैकी हा एक व्हिडीओ आहे.