इंग्लिशमध्ये सत्यनारायणाची पूजा सांगणाऱ्या भटजीचा Video व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – हिंदूधर्मात पूजेला (Worship of Satyanarayana) खूप महत्व आहे. त्यातल्या त्यात पवित्र श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजेला खूप महत्व असते. दरवर्षी श्रावणात अनेक घरांमध्ये सत्यनारायणाची पूजा (Worship of Satyanarayana) आयोजित केली जाते. अशाच एका पूजेचा (Worship of Satyanarayana) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सत्यनारायणाची पूजा, आता त्यात वेगळं काय असा प्रश्न आपल्याला पडला असेल पण या व्हिडीओ मध्ये गुरुजी चक्क इंग्रजी मध्ये पूजा बोलताना दिसत आहेत.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
या व्हिडीओ मध्ये आपण पाहू शकता की पूजासाहित्य (Worship of Satyanarayana) आणि ते मांडण्याची पद्धत दाक्षिणात्य संस्कृतीनुसार दिसत आहे. अनेक दाक्षिणात्य राज्यांमध्ये मायबोली नंतर केवळ इंग्रजीमधूनच संवाद साधला जातो त्यामुळे कदाचित हा व्हिडीओ मूळ दक्षिण भारतीय कुटुंबातील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या मॉर्डन गुरुजीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अनेकदा पूजा (Worship of Satyanarayana) विधींमध्ये भटजी काय बोलतात हे आपल्याला समजत नाही साहजिकच पूजेचा मूळ हेतू यामुळे अपुरा राहतो. सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओ मध्ये मात्र हे भटजी त्या पूजेला बसलेल्या दांपत्याला नीट समजावून सत्यनारायणाची कथा सांगताना दिसत आहेत. इंग्रजी मध्ये सांगतानाही कथेचा मूळ अर्थ कुठेही बदललेला दिसत नाही त्यामुळेच अनेकांनी या गुरुजींचे कौतुक केले आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल

शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय

Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???

सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???

ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!