Viral Video : महिलेने गव्हाच्या पिठात टाकला केस धुण्याचा शाम्पू; Video पाहून युजर्स म्हणाले, ‘एखादा मरेल..’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही अतरंगी पहायला मिळतं. जेव्हापासून रिल्स सुरु झाले आहेत तेव्हापासून रील मेकर्सचा सुळसुळाट पहायला मिळतोय. सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी कधी कोण काय करेल? याचा काहीही नेम नाही. कुणी जीवावर खेळतं, तर कुणी विचित्र चाळे करून डोकं फिरवत. इतकंच काय तर अनेकदा असं वाटत की, जगभरातले सगळे जुगाडू सोशल मीडियावर सक्रिय झालेत. अशातच सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ही महिला गव्हाच्या पिठात शाम्पू घालताना दिसतेय. पाहुयात काय आहे हा व्हिडीओ.

गव्हाच्या पिठात टाकला शाम्पू (Viral Video)

सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होतात. ज्यामध्ये हा व्हिडिओदेखील व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक महिला १ मोठा चमचा गव्हाचे पीठ घेते. या पिठामध्ये तिने १ छोटा चमचा मीठ टाकले. यानंतर पिठात तिने केस धुण्याचा शाम्पू टाकला. व्हिडिओत शाम्पूचे नाव स्पष्ट दिसत आहे. शाम्पू आणि गव्हाचे पीठ एकत्र करून या महिलेने एक प्रकारचा स्क्रब तयार केल्याचे दिसते. या स्क्रबच्या मदतीने ती घरातील भांडी घासून दाखवते आणि त्यानंतर बेसिन स्वच्छ करताना दिसते.



या व्हिडिओतील महिला सांगतेय की, हा शाम्पू गव्हाच्या पिठामध्ये मिसळताना त्याची पेस्ट तयार करू नका. तर याची पावडर राहील अशी काळजी घ्या. या पावडरच्या मदतीने भांडयांवरील काळपटपणा दूर करता येतो. त्यामुळे हा जुगाड एकदा तरी नक्की करून बघा. हा व्हिडीओ आतापर्यंत अनेक युजर्सने पाहीला आहे. (Viral Video)कधी विचारही केला नसेल असा हा जुगाड पाहून अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यावरील प्रतिक्रिया लक्ष वेधून घेत आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर prajakta_salve_marathi नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘गव्हाच्या पिठामध्ये शाम्पु टाकताच कमाल झाली’. या व्हिडिओवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Viral Video) यातील एकाने लिहिलं आहे की, ‘हा व्हिडिओ जर कोणी पूर्ण बघितला नाही तर तो शाम्पूच्या चपात्या खाईल’. तर आणखी एकाने लिहलं, ‘पिठापेक्षा राख वापरायची की, उगीच अन्नासोबत खेळ कशाला?’ तसे अन्य एकाने लिहिले, ‘अहो मॅडम एखादा मरल तुमचे व्हिडिओ पाहून’. तर आणखी एका युजरने लिहिलंय, ‘ताई माझ काळ पडलेलं नशिब चकचकेल का हे वापरल्यावर?’