Viral Video : काश्मिरमध्ये मराठा बटालियनकडून शिवरायांना अनोखी मानवंदना; मुख्यमंत्र्यांनी शेअर केला व्हिडीओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोमवारी १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण जगभरात तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच अनेक गड किल्ल्यांवर शिवभक्त आणि शिवप्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शासकीय स्वरूपात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांची उपस्थिती लाभली होती.

दरम्यान, काश्मीरमध्ये मात्र शिवजयंतीनिमित्त वेगळाच उत्साह पहायला मिळाला. काश्मीरच्या खोऱ्यात हिमवर्षा सुरु असताना मराठा बटालियनने छत्रपती शिवाजी महाराजांना अत्यंत अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली आहे. (Viral Video) याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सर्व नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. पाहुयात हा व्हिडीओ.

मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ शेअर करत केले कौतुक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकृत सोशल मीडिया X हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. जो काश्मीरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कशी साजरी करण्यात आली? हे दाखवतो आहे. (Viral Video) हा व्हिडिओ शेअर करताना एकनाथ शिंदे यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ‘काश्मीर खोऱ्यात हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांचा जय घोष… कुपवाडा येथील भारत- पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या ठिकाणी #शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली’.

‘सर्वत्र बर्फाच्छादित वातावरण, उणे तापमानात लष्कराच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले, याबद्दल मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी भारतीय लष्कराच्या जवानांचे अभिनंदन करीत त्यांचे कौतुक केले. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. आज याठिकाणी मराठा बटालियनच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी सलामी दिली’.

मराठा बटालियनकडून शिवरायांना अनोखी मानवंदना (Viral Video)

मुख्यमंत्र्यांनी हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर सोशल मीडियावरील नेटकऱ्यांकडून या व्हिडिओला पसंती देण्यात आली आहे. तसेच हा व्हिडिओ तुफान व्हायरल देखील होताना दिसतोय. यावर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे. गतवर्षी काश्मीरमध्ये नोव्हेंबर महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. यंदा शिवजयंती निमित्त याच ठिकाणी मराठा बटालियनच्या जवानांनी शिवरायांना अनोखी सलामी दिल्याचा हा व्हिडिओ पाहिला असता मन अगदी गदगदून जात आहे.