Viral Video | तहानेने व्याकुळ झालेल्या किंग कोब्राला धाडसाने पाणी पाजून तरुणाने दिले जीवनदान, व्हिडीओ जोरदार व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video | सोशल मीडियावर नेहमीच नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकजन ते व्हिडिओ मनोरंजन म्हणून घेतात. तर काही काही व्हिडिओ बघून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बघतो. आणि आपण तेच व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या बाहेर झालेला आहे. हा व्हिडिओ सापाचा आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सापाला पाणी पाजताना दिसत आहे. आतापर्यंत आपण सापाचे अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत. परंतु हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

आपल्याकडे अनेक जातीचे साप आहेत त्याच्यात कोब्रा या सापाची जात खूप प्रसिद्ध आहे. आणि त्याचे एक वैशिष्ट्य देखील आहे. ते म्हणजे एकदा का किंग कोब्रा चावाला तर त्या व्यक्तीचा मृत्यू जागीच होतो. वेळीच उपचार घेतले तर त्या रुग्णाची वाचण्याची शक्यता अधिक असते. परंतु हा साप विषारी असल्याने त्याची लागण बऱ्याचवेळा लोकांना होते. आणि संपूर्ण शरीरात पसरते परंतु या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चक्क या सापाला पाणी पाजताना दिसत आहे.

वायरल झालेले या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, एक व्यक्ती लांबलचक कोब्रा सापाला पाणी पाजत आहे. तो साफ जमिनीवर पसरलेला आहे. एक व्यक्ती एका हाताने त्याला पाठीमागे ढकलत आहे तर दुसऱ्या व्यक्ती आपल्या हातातील बॉटलने त्याला पाणी पाजते. परंतु पाणी पाजताना हा व्यक्ती काहीशा प्रमाणात घाबरलेला दिसत आहे.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकजण या व्हिडिओवर टीका करत आहेत. तर काही लोकांना हा व्हिडिओ आवडलेला आहे तर अनेक लोक या सापाबाबत सविस्तर माहिती देखील विचारत आहे.