Viral Video | अबब ! महाकाय अजगर रस्ता ओलांडताना पाहून वाहतूक ठप्प, व्हिडिओ व्हायरल

0
2
Viral Video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video | सोशल मीडियावर आजकाल मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ हे मनोरंजनासाठी असतात. तर काही व्हिडिओ हे पाहिल्यावर आपण आश्चर्यचकित होतो. अशातच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास देखील बसणार नाही. सोशल मीडियावर वन्यजीवांचे व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. अनेकदा आपण साप किंवा अजगर लांबून बघतो. परंतु सापाजवळ जाण्याचे धाडस सहसा कोणी करत नाही. असाच या अजगराबाबतचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

अजगराची ही (Viral Video) घटना सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. ज्यामध्ये एक महाकाय अजगर ट्राफिकमधून जाताना दिसत आहे. हे भले मोठे अजगर पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा वेग हळू होतो. या व्हिडिओमध्ये अजगर काळ्या रंगाचे आहे. ते हायवे ओलांडताना दिसत आहे. प्रथम ते हळूहळू पहिली लेन क्रॉस करते. आणि नंतर दुभाजकातून रस्त्याची दुसरी लाईन पार करत. हे दृश्य ब्राझीलमधील असल्याचे सांगितले जात आहे.

हा व्हिडिओ सध्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 7 लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे त्याचप्रमाणे 50000 लोकांनी या व्हिडिओला लाईक केलेले आहे. या व्हिडिओवर अनेक लोक कमेंट देखील करत आहे. या व्हिडिओवर कमेंट करत एका व्यक्तीने लिहिलेले आहे की, ,”आपण जंगल तोडून महामार्ग तयार केले मग हे असेच होणार.’ दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले आहे की, “हा खूप जाड आणि धोकादायक साप आहे.आजपर्यंत यापेक्षा मोठा साप मी पाहिलेला नाही” अशा प्रकारे अनेक लोक या व्हिडिओवर त्यांचे मत व्यक्त करत आहे.