Viral Video : भरधाव गाडीच्या धडकेने वाघ गंभीर जखमी; उपचार मिळण्याआधीच सोडला जीव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आपल्या महाराष्ट्रात अनेक अभयारण्ये आहेत. त्यापैकी एक म्हणजे भंडारा आणि गोंदिया महामार्गावरील नवेगाव नागझिरा अभयारण्य. या अभयारण्यात अनेक प्राणी वास्तव्य करतात. ज्यामध्ये वाघाचा देखील समावेश आहे. महाराष्ट्रात वाघांची संख्या कमी असली तरीही काही अभयारण्यात वाघ पहायला मिळतात. त्यापैकी एक हे अभयारण्य आहे. दरम्यान, अनेक पर्यटक या ठिकाणी जंगल सफारी करायला जात असतात. अशाच काही पर्यटकांच्या गाडीने एका वाघाला जोरदार टक्कर दिल्याने वाघ अत्यंत जखमी झाल्याची घटना अलीकडेच घडली आहे. या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Creta गाडीच्या धडकेने वाघ जखमी (Viral Video)

भंडारा- गोंदिया महामार्गावरील नवेगाव नागझिरा अभ्यारण्यातजवळ घडलेल्या या घटनेत वाघ गंभीर जखमी झाल्याचे समजत आहे. वास्तविक, ही गाडी इतकी वेगात होती की कार चालकाला गाडी नियंत्रित न झाल्याने समोर आलेल्या वाघाला जोरदार धडक दिली गेली. या धडकेत वाघ जागीच पडला आणि गंभीर जखमी झाला. पायाला दुखापत झाल्याने त्याला उभं राहता येत नव्हतं. मात्र काही करून जंगलात परत जाण्यासाठीची त्याची धडपड या व्हिडिओत पहायला मिळते आहे.

वाघाचा दुर्दैवी मृत्यू

या व्हिडीओसोबत माहिती देताना युजरने म्हटलंय, ‘नवेगाव- नागझिरा अभयारण्यातून जाणाऱ्या भंडारा- गोंदिया महामार्गावर हा प्रकार घडला. येथे भरधाव येणाऱ्या क्रेटा कारने रस्ता ओलांडणाऱ्या वाघाला जोरदार धडक दिली. (Viral Video) ही धडक इतकी जोरदार होती की, कारच्या २ एअर बॅग्ज बाहेर आल्या. कारचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले. मात्र, गाडीतील कोणत्याही व्यक्तीला इजा झालेली नाही. दरम्यान, या अपघातात वाघाला मात्र जबर मार बसला आहे. या घटनेची माहिती वन विभागाला मिळाली असता रात्रीच्या अंधारात टॉर्चचा वापर करून वाघाचा शोध घेण्यात आला. मात्र दुर्दैवाची बाब अशी की, वाघाला उपचारासाठी नागपूरला नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेबाबत वन्यजीवप्रेमी हळहळ व्यक्त करत आहेत.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अगदी १९ सेकंदाचा हा व्हिडीओ पाहून वाघाला किती वेदना झाल्या असतील याचा अंदाज येत आहे. हा व्हिडीओ फारच क्लेशदायक आहे. (Viral Video) जो पाहून अनेक नेटकऱ्यांनी त्या क्रेटा वाहन चालकावर संताप व्यक्त केला आहे. या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडिया X हॅण्डलवर Prateek34381357 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.