हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आतापर्यंत तुम्ही अनेक सिनेमा, सिरीजमध्ये एलियनविषयी ऐकलं, पाहिलं असेल. यामध्ये एलियन आकाशात प्रवास करताना UFO चा वापर करताना दाखवले जाते. UFO हे तबकडीसारखे दिसते. ज्याचा आकार गोल आणि अत्यंत भव्य असतो. अनेक लोकांना एलियन, त्यांचं राहणीमान आणि UFO बद्दल फार कुतूहल असते. त्यामुळे सोशल मीडियावर जर कुणी याबाबत कोणतीही पोस्ट केली तर ती आधी व्हायरल होते. अशातच नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक उडती तबकडी दिसतेय. जी पाहून अनेकांनी एलियनचे UFO दिसल्याचा अंदाज लावला आहे.
सूर्यग्रहणावेळी दिसली उडती तबकडी (Viral Video)
आजपर्यंत अंतराळातून परग्रहवासी यूएफओच्या माध्यमातून पृथ्वीवर उतरल्याचे अनेक बातम्या किंवा अफवा तुम्ही ऐकल्या असली. मात्र यांचा काही ठोस पुरावा कधीच समोर आलेला नाही. अशातच जेव्हा सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा मात्र सगळ्यांचे डोळे खुलेच्या खुले राहिले. सोशल मीडिया एक्स हँडल MattWallace888 वरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये आकाशातून भरधाव वेगात उडणारी तबकडी दिसून आल्याचा दावा करण्यात आला आहे. हे दृश्य ८ एप्रिल २०२४ रोजी दिसलेल्या सूर्यग्रहणावेळी दिसून आल्याचे सांगण्यात आले आहे.
८ एप्रिल रोजी या वर्षातील पहिले मोठे खग्रास सूर्यग्रहण झाले. जे भारतातून पाहता आले नाही. मात्र, अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये दिसले. या ग्रहणादरम्यान आकाशात वेगाने उडणारी तबकडी पाहिल्याचे या युजरचे म्हणणे आहे. (Viral Video) हा व्हिडीओ शूट करणारी व्यक्ती सूर्याला लागणारे ग्रहण दाखवित असताना ढगांमधून एक काळ्या रंगाची विमानसदृश सावली अत्यंत वेगाने जाताना दिसते आहे. काही वेळाने तशीच आणखी एक सावली विरुद्ध बाजूला उडत जाताना दिसते. आकाशात दिसणारे सूर्य ग्रहण आणि ती काळी सावली दोन्ही गोष्टी अत्यंत आश्चर्यकारक आहेत.
रेड अलर्ट
हा व्हिडीओ शेअर करतेवेळी वापरकर्त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘रेड ॲलर्ट : आज सूर्यग्रहणाच्या वेळी अर्लिंग्टन टेक्सास इथे UFO दिसल्याचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. ती तबकडी ढगांमध्ये अचानक दिसेनाशी झाल्यामुळे लोक घाबरून गेले आहेत’. हा व्हिडीओ सोशल मंडीईआयवर तुफान व्हायरल होतो आहे. (Viral Video) या व्हिडीओमध्ये करण्यात आलेला दावा खरा की खोटा याबाबत काही ठोस पुरावा नाही. मात्र, व्हायरल होणाऱ्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे हे नक्की. या व्हिडीओला आतापर्यंत २३.८ मिलियन पेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत.