Viral Video | गरमीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अनेक ठिकाणचा उन्हाचा पारा वाढलेला आहे. घरातून निघतात देखील खूप विचार करावा लागतो. गर्मीमध्ये अनेक लोक थंडगार गोष्टी खातात. आजकाल आईस्क्रीमच्या नावाखाली अनेक पदार्थ विकले जात आहे. कोणी मिरचीची आईस्क्रीम बनवत आहे, तर तुम्ही टोमॅटो आईस्क्रीम तर कोणी मँगोची कुल्फी देखील बनवत आहे. पण हे सगळे पदार्थ कमी होते. म्हणून आता बाजारात आणखी एक नवीन आईस्क्रीम आलेली आहे. या पदार्थाला तंदुरी चिकन आइस्क्रीम असं म्हटलं जात आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल. परंतु हे खरे आहे. हे आईस्क्रीम चिकन वापरून तयार केलेले आहे.
कसं तयार करतात हे आईस्क्रीम ? | Viral Video
सगळ्यात आधी तंदुरी चिकन घेतले आणि त्याचे बारीक बारीक तुकडे केले. मग त्या तुकड्यांमध्ये दूध मिक्स करून त्याचा लगदा तयार केला. यामध्ये चोको चिप्स आणि चॉकलेट सिरप टाकला आणि हे मिश्रण एकत्र करून बर्फाच्या लादीवर पसरवलं. हे मिश्रण काही वेळानंतर गोठून तंदुरी आईस्क्रीम तयार झाली.
एक्स अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत दहा हजारांपेक्षाही व्ह्यूज आलेले आहे. अनेक लोकांनी यावर जोरदार टीका केलेली आहे. कोणी म्हणत आहे की, “हा आईस्क्रीमवर अत्याचार आहे.” अशा अनेक प्रकारे या व्हिडिओवर सध्या कमेंट येताना दिसत आहेत.