Viral Video | झाडाला फुटलाय झरा ! व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल हा चमत्कार झाला कसा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video | झाडे आपल्या वातावरणातील एक अविभाज्य घटक आहेत. एवढंच काय तर आपल्या आयुष्यात देखील झाडांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण या झाडांमुळेच आपल्याला ऑक्सिजन मिळतो, आणि आपण श्वास घेऊ शकतो. एवढेच नाहीतरी झाडांपासून आपल्याला फळे, फुले, भाज्या, अन्न लाकूड या सगळ्या गोष्टी मिळतात. याचाच अर्थ झाडे हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य असा घटक आहे. झाडे असतील तरच आपल्या आजूबाजूची हवा शुद्ध राहते. त्याचप्रमाणे चांगल्या प्रकारे पाऊस देखील पडू शकतो. अशा अनेक गोष्टी आपल्याला माहीतच आहेत. परंतु झाड आपल्याला पाणी देऊ शकते हे तुम्ही कधी ऐकले आहे? का कदाचित हे तुम्हाला जरा विचित्र वाटले असेल. परंतु हे खरे आहे. एका झाडातून पाण्याचा झरा वाहत असल्याचा एक व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

हा व्हिडिओ आंध्रप्रदेशमधून व्हायरल झालेला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल होताना दिसत आहे. आंध्र प्रदेशातील एका वनविभागातील काही कर्मचाऱ्यांनी इंडियन लॉरेल वृक्षाच्या खोडावर काही भाग तोडला आणि त्यानंतर त्याच्यातून अचानक पाणी बाहेर पडू लागलं. हे पाणी पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Viral Video) आपण पाहू शकतो की, एक व्यक्ती कुऱ्हाडीने त्या झाडाला मारतो आणि त्या झाडाची साल तुटल्याबरोबर झाडातून जोरदार पाण्याचा प्रवाह येताना दिसतो. हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले आहे. खरं तर हे झाड इतरत्र कुठेही आढळत नाही. परंतु आपल्या देशात आढळते त्यातून बाहेर येणारे पाणी हे पूर्णपणे स्वच्छ आणि पिण्यास योग्य असते.

या झाडाचे नाव टर्मिलीया टोमेनटोसा असे आहे. या झाडाला क्रोकोडाइल बार्क ट्रि असे देखील म्हणतात. हे झाड आंध्रप्रदेशातील गोदावरी परिसरातील पापीकोंडा राष्ट्रीय अभय राहण्यामध्ये आढळतात. या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे ही झाडे 30 मीटरपर्यंत उंच वाढतात. शुष्क आणि दमट जंगलात ही झाडे वाढतात. या झाडाची खोडे पाण्याने भरलेली असतात. आणि हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु हा कोणताही चमत्कार नसून हे त्या झाडाचे वैशिष्ट्य आहे. परंतु हे झाड इतरत्र कुठेही आढळत नाही.