Viral Video | आजकाल सोशल मीडियावर सगळेच लोक सक्रिय असतात. भारतातील प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा हे देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. अनेकदा ते वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत असतात. सर्वसामान्य माणसांना पडणाऱ्या प्रश्नावर त्यांचे मतही मांडत असतात. त्याचप्रमाणे अनेक जुगाड केलेले व्हिडिओ तसेच प्रयोग देखील ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना चांगलाच दिलासा मिळालेला आहे.
तीन महिन्यापूर्वी मुंबईत राहत असणाऱ्या सुभाजीत मुखर्जी यांनी एसीतून निघणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करता यावा यासाठी एक नवीन टेक्निक शोधून काढली होती. या टेक्निकमुळे एसीतून जे पाणी निघत होते, त्या पाण्याची बचत होत होती. तसेच इतर कामांसाठी ते पाणी पुन्हा एकदा वापरता येत होते. अनेक लोकांनी त्यांची ही टेक्निक वापरली देखील होती. परंतु त्याच्या या टेक्निकला जास्त प्रतिसाद मिळाला नव्हता.
अशातच आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून सुभाजित यांचा हा व्हिडिओ पुन्हा एकदा शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी एसीच्या पाण्याचा पुनर्वापर तुम्हाला कसा करता येईल हे दाखवले आहे. हा व्हिडिओ शेअर करून त्यांनी कॅप्शन दिलेले आहे की, “ही पद्धत देशभरात एसी सोबत लावायला हवी पाणी अनमोल आणि ते सुरक्षित पद्धतीने जपायला हवे.” त्यांनी सुभाषित यांनी केलेली ही टेक्निक शेअर केलेली आहे.
सुभाजित यांनी म्हटले आहे की, आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले आणि त्यानंतर त्यांना सतत कॉल येत आहेत. 500 पेक्षा जास्त ऑर्डर त्यांना मिळालेल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, “माझ्या डोक्यात एक आयडिया आली होती. जर एसीतून टपकणारे पाणी पाईपमध्ये जमा करून ते नळाद्वारे जोडण्यात आले. पाईप भरल्यानंतर नळाद्वारे ते पुन्हा बादलीमध्ये काढता येते. या पाण्याचा वापर लादी पुसण्यासाठी, घर साफ करण्यासाठी किंवा झाडांना देण्यासाठी करू शकतो. असे केल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाचण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या सिस्टीमचा खर्च 1200 ते 1500 रुपये आहे.”
आनंद महिंद्रा यांनी केलेल्या या ट्विटनंतर हा व्हिडिओ चांगला चर्चेत आला आहे. त्यांचे ट्विटरवर 1 कोटीपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत त्यामुळे खूप लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
शाळेमध्ये लावणार सिस्टीम | Viral Video
सुभाजित ही सिस्टम शाळेत मोफत लावण्याचा विचार करत आहे. जेणेकरून शाळेतील विद्यार्थ्यांना देखील हे समजेल आणि त्यांच्या घरात देखील ते अशा प्रकारची सिस्टीम लावतील.
पुढे ते म्हणाले की, “मला मुंबई व्यतिरिक्त इतर अनेक शहरातून देखील ऑर्डर्स मिळाल्या आहेत. मला असं वाटतंय की, मी दुसऱ्यांना देखील या पद्धतीबद्दल सांगावे. जेणेकरून ते स्वतःची पद्धत वापरू शकतील.” ते गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण संरक्षणासाठी काम करतात. परंतु त्यांनी आत्ता केलेली ही पाणी वाचवण्याची सिस्टीम खूपच प्रसिद्ध झालेली आहे.