Viral Video | अर्रर्र ! चालत्या स्कूटरवर फोनवर गप्पा मारण्याचा जुगाड केला पण वाया गेला, पाहा व्हिडिओ

Viral Video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video | आजकाल सोशल मीडियाचा वापर सगळेच लोक करतात. जगाच्या कानाकोपऱ्यातील गोष्ट आपल्याला सोशल मीडियावर घरी बसून समजते. सोशल मीडिया हे एक ज्ञान समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचे साधन आहे. ज्यामुळे आपण आपले कौशल्य, आपले ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. आपल्या ज्ञानाचा वापर इतरांना देखील होऊ शकतो. परंतु आजकाल सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी कमी आणि वाईट गोष्टी पसरवण्यासाठी जास्त होत आहे.

सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती महिला स्कूटर चालवताना दिसत आहे. परंतु गाडी चालवताना ती महिला फोनवर बोलत आहे. परंतु ती तिच्या हाताचा वापर न करता फोनवर बोलत आहे. तिने तिच्या डोक्याला स्कार्फ बांधला आहे. आणि त्या स्कार्पमध्ये मोबाईल अडकवलेला आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

आजकाल गाडी चालवताना अनेक नियम देखील मोठ्या प्रमाणात बदललेले आहेत. त्यामुळे लोकांना गाडी चालवताना खूप खबरदारी घ्यावी लागते. या महिलेने गाडी चालवताना फोनवर न बोलण्याच्या नियमाचे उल्लंघन केलेले आहे. तिने जरी फोनला हात लावला नसला, तरीही तिच्यासाठी एक खूप मोठी जोखीम ठरू शकते. त्यामुळे सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. हा व्हिडिओ X प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे.आत्तापर्यंत या व्हिडिओला 16 हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिलेले आहे. याआधी instagram वर देखील हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला होता. नंतर तो इतर सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर शेअर केला. आता हा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झालेला दिसत आहे.

एका व्यक्तीने हा व्हिडिओ शेअर करून कॅप्शन दिले आहे की, “गाडी चालवताना फोन वापरण्याचा एक अतिशय मजेशीर मार्ग कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच अपलोड केला आहे. शहरात ठिकठिकाणी वाहतुकी पोलीस तैनात असताना अनेक ठिकाणी देखील AI कॅमेरे बसवून देखील, महिलेने असे काही करण्याचा विचार देखील कसा केला? याचे मला आश्चर्य वाटते. या नवीन गोष्टीला मी जुगाड किंवा काही म्हणू नये असे मला असे वाटत नाही परंतु हे सर्व चुकीच्या कारणांमुळे व्हायरल होत आहे.”

तिच्या या व्हिडिओवर अनेक लोक कमेंट करत आहे. अनेकांना तिचा हा जुगाड अजिबात आवडला नाही. एका व्यक्तीने या व्हिडिओवर कमेंट केली आहे की, “ट्राफिक पोलिसांनी जागीच उल्लंघन करणाऱ्यांचा शोध घेऊन देण्याचा नवीन नियम आहे. का मला असे वाटते की काही दिवसांपूर्वी ते वाचले आणि त्याबद्दल कोणताही लेख सापडला नाही.” अशाप्रकारे अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करत आहेत