महिला शिक्षिकेकडून निवृत्त सैनिकाला काठीने मारहाण आणि शिवीगाळ, Video आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला शिक्षिका सुरक्षारक्षकाला शिवीगाळ आणि काठीने मारहाण करताना दिसत आहे. सुरक्षारक्षक शांतपणे उभा असताना महिला त्याला शिवीगाळ करत, काठीने मारहाण (woman teacher abusing and beating guard) करत आहे. सुरक्षारक्षक परिसरातील कुत्र्यांना नीट वागणूक देत नसल्यामुळे महिलेने हि मारहाण (woman teacher abusing and beating guard) केली आहे. हि घटना आग्रा या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
ही घटना आग्रा पोलीस ठाण्याच्या मागील बाजूला असणाऱ्या एलआयसी ऑफिसर कॉलनीमध्ये घडली आहे. शनिवारी संध्याकाळी, सुरक्षारक्षक कुत्रयांना सोसायटीतून बाहेर काढत असताना या महिलेने त्या सुरक्षारक्षकाशी वाद घालायला सुरुवात (woman teacher abusing and beating guard) केली. यावेळी या महिलेने कुत्र्यांना ठार मारलं जात असल्याचा आरोप केला. यावेळी महिला इतकी संतापली की तिने काठीने त्याला मारहाण (woman teacher abusing and beating guard) केली तसेच या सुरक्षा रक्षकाला खालच्या भाषेत शिवीगाळसुद्धा केली.

पीडित सुरक्षारक्षक निवृत्त जवान
अखिलेश सिंह असे या पीडित सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. ते निवृत्त जवान आहेत. एलआयसी ऑफिसर कॉलनीत ते सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. “रस्त्यावरील श्वान सोसायटीत घुसून परिसर अस्वच्छ करतात. त्यांनी कॉलनीतील काही लोकांवर हल्लाही केला आहे. अशा स्थितीत आपण त्यांना आतमध्ये प्रवेश करु देत नाही,” असे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला (woman teacher abusing and beating guard) असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर