हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आपल्या भारत देश धर्मनिरपेक्ष असल्यामुळे इथे वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे लोक राहतात. संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी हे लोक आपापले सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे करताना दिसतात. नुकताच हिंदूंनी त्यांचा होळी हा मोठा सण साजरा केला. होळी म्हणजे रंगांची नुसती उधळण आणि नकारात्मकतेचा संग सोडून सकारात्मक गोष्टी आत्मसाद करण्याचा दिवस. आत्ताच जग डिजिटल आहे आणि त्यामुळे कोणताही सण आला की सोशल मीडिया दणाणून उठतो.
कन्टेन्ट क्रिएटर्स, रिल मेकर्स, फूड ब्लॉगर, इन्फ्ल्यूएंसर्स आणि अनेक कलाकार सोशल मीडियावर वेगवेगळ्या व्हिडीओ शेअर करताना दिसतात. (Viral Video) त्यात सण असला की वेगवेगळ्या पद्धतीने हे कलाकार पोस्ट शेअर करतात. दरम्यान एका तरुणीला होळीनिमित्त रील बनवणे चांगलेच महागात पडल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ अक्षरशः धडकी भरवणारा आहे. या व्हायरल व्हिडीओत ही तरुणी होळीनिमित्त स्टंट करताना दिसते आहे.
काय आहे व्हिडिओत? (Viral Video)
या व्हिडिओत एक तरुणी नारंगी रंगाची साडी नेसून पायात स्पोर्ट्स शूज घालून एक अनोखा स्टंट करण्यासाठी तयारीत दिसतेय. या तरुणीच्या बुटाला सेलोटेपने कलर पॉप चिटकवले आहेत. हा स्टेण्ट करताना या तरुणीचा मित्र या कलर पॉपला आग लावतो आणि मग तरुणी पोलवर हात ठेवून गोल गोल फेऱ्या घेताना दिसते. ती गोल फिरताना कलर पॉपमधून रंग सर्वत्र पसरताना दिसत आहेत. दरम्यान पुढे जे घडलंय ते पाहून मात्र कुणाचीही हवा टाईट होईल.
(Viral Video) या व्हिडीओत स्टंट शूट करून झाल्यावर तरुणी खाली उतरते. यानंतर तिच्या बुटांना जोडलेल्या ‘कलर पॉपला’ लावलेली आग विझवण्याआधीच तिच्या साडीचा फॉल पेट घेतो आणि तरुणी उद्या मारून आग विझवू लागते. आग विझवण्यासाठी तिचे मित्र-मैत्रिणीसुद्धा धावून येतात. हा व्हिडीओ सोशल मीडिया इंस्टाग्रामवर shalugymnast या हँडलवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी तरुणीच्या स्टंटबाजीची निंदा केली आहे.