Viral Video : रेल्वेचे डॅशिंग कर्मचारी…! स्वतःचा जीव धोक्यात घालून दुरुस्त केली रेल्वे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video : कधी कधी आपल्यासमोर अशा काही घटना घडतात ज्या पाहून आपल्याला शाबासकी देण्याचे मन होते. अशीच शाबासकी मिळवण्यासाठी पात्र ठरले आहेत दोन रेल्वे क्रमाचारी. आपल्या जीवाची आजिबात पर्वा न करता या दोन रेल्वे कर्मचाऱ्यांनी पुलाच्या मध्यभागी थांबलेली रेल्वे सुरु केली. याबाबतचा व्हडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत असून या दोन कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे. चला जाणून घेऊया नेमकी काय आहे ही घटना ?

मिळालेल्या माहितीनुसार, बगाहामध्ये पॅसेंजर ट्रेनच्या लोको पायलट आणि को-लोको पायलटने आपला जीव धोक्यात घालून पुलाच्या मध्यभागी उभी असलेली ट्रेन दुरुस्त केली. यादरम्यान, लोको पायलट ट्रेन आणि ट्रॅकच्या मध्ये घसरत गेला आणि बिघाडाच्या ठिकाणी पोहोचला. तर दुसऱ्या कर्मचाऱ्याने पुलावरून लटकून वायर ओढली, त्यामुळे ट्रेन पुन्हा सुरू होऊ शकली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे.

नक्की काय घडले ? (Viral Video)

गोरखपूरहून नरकटियागंजला जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेन ०५४९७ च्या इंजिनमध्ये एअर लिकेज झाली. त्यामुळे वाल्मिकी नगर ते पाणीहवा दरम्यानच्या पुलावर गाडी थांबली. वाल्मिकी नगर रोड स्टेशनवरून ट्रेन सुरू होताच यूएल व्हॉल्व्हमधून गळती सुरू झाली आणि ट्रेन KM-298/20 पुल क्रमांक 382 वर थांबली.पुलाच्या मध्यभागी गाडी थांबल्याने प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण होते. पुलाच्या (Viral Video) मध्यभागी यूएल व्हॉल्व्हला गळती लागली होती. अशा स्थितीत गळती बंद करणे हे मोठे आव्हान होते.

या आपत्कालीन परिस्थितीत ट्रेनचे लोको पायलट अजय यादव आणि सहाय्यक लोको पायलट रणजीत कुमार यांनी जीवाची पर्वा न करता पुलावरून ट्रेनखाली पोहोचलेआणि व्हॉल्व्ह दुरुस्त केला. ट्रेनची दुरुस्ती केल्यानंतर ती पुढे गेली. इंजिनमध्ये हवा गळतीची समस्या निर्माण झाल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. या ट्रेनची दुरुस्ती होईपर्यंत प्रवाशांनी आपला जीव मुठीत धरला होता. कारण दुसरी गाडी त्या ट्रॅक वर येण्यापूर्वी दुरुसती होणे गरजेचे होते. ट्रेनचे लोको पायलट अजय यादव आणि सहाय्यक लोको पायलट रणजीत कुमार यांनी मोठ्या धाडसाने ट्रेनची दुरुस्ती केली. त्यांचा व्हडिओ (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.

रेल्वे विभागाकडून मिळणार बक्षीस (Viral Video)

त्यांच्या या धाडसी कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून दोघांनाही बक्षीस देण्यात येणार आहे. याबाबत माहिती देताना डीआरएम बीना श्रीवास्तव यांनी सांगितले की, गुरुवारी ट्रेनचा व्हॉल्व्ह खराब झाला होता, जो लोको पायलट आणि असिस्टंटने ट्रेनमधून (Viral Video) खाली उतरवून दुरुस्त केला. या कामासाठी रेल्वे त्यांना 10,000 रुपयांचा पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहे.