Viral Video : सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होतात, पण काही व्हिडीओ आपल्याला अक्षरशः दचकवतात. खरतर आजकाल व्हिडिओला (Viral Video) काही लाईक्स आणि व्हीव्यूज मिळवण्यासाठी नको ते करणारे महाभाग आढळतात. त्यांना रीलच्या नादात स्वात:च्या जीवाची पर्वा सुद्धा नसते. मीडियावर अशाच एका महिलेचा प्रताप सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतो आहे.
काय आहे व्हिडीओ ? (Viral Video)
अशाच एक धक्कादायक स्टंटचा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. व्हिडीओमध्ये एक तरुणी रेल्वे रुळावर बिनधास्तपणे झोपलेली दिसते. ती फोन मध्ये व्हिडीओ काढताना दिसते, जेव्हा एक भरधाव वेगाने ट्रेन तिच्या जवळून जात असते. हे दृश्य पाहून आपणही अवाक व्हाल! सोशल मीडियावर या स्टंटला “डेअरिंग” असं कॅप्शन दिलं गेले आहे.
व्हिडीओ इंस्टाग्राम अकाउंट @rupaligaikwad609 वरून शेअर करण्यात आला असून, त्यात ‘हिच्या डेअरिंगला किती मार्क्स देणार?’ असे कॅप्शन दिले गेले आहे. एकच झटक्यात व्हिडीओला ७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत!
सोशल मीडियाच्या मागे जीवाची किंमत (Viral Video)
काही युजर्सनी त्याच्या प्रतिक्रियांमध्ये म्हटलं आहे की, “नक्कीच ती फोन ठेवून बाजूला गेली असणार,” तर दुसऱ्या युजरने त्याला “अशा स्टंट्सला मूर्खपणा म्हणता येईल” अशी टिप्पणी केली. काहींनी हे देखील सांगितलं की, “कदाचित तिला या करतांना पुढे कायदेशीर अडचणी येतील.”
खेळ धोक्याचा सावध रहा
व्हायरल व्हिडीओचं हे दृश्य एक अत्यंत जोखमीचं उदाहरण आहे. सोशल मीडियावर फॉलोअर्स मिळवण्यासाठी अथवा प्रसिद्धीच्या मागे जीव धोक्यात घालणे किती गंभीर होऊ शकते, याचं भान ठेवणं आवश्यक आहे. आपणही अशा धोकादायक स्टंट्सपासून (Viral Video) दूर राहून फक्त सुरक्षिततेला प्राधान्य देणं आवश्यक आहे.