Viral Video | दूध पिताना 8 महिन्यांची चिमुकली पडली खाली, व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल

Viral Video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video | सोशल मीडियावर दररोज आहेत. व्हिडिओ व्हायरल होत असलेले काही व्हिडिओ हे प्रेरणादायी असतात. तर काही व्हिडिओ असे असतात, जे पाहून काळजाचा ठोकाच चुकतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तुमच्या घरामध्ये जर एखादे लहान मुल असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. कारण अनेकदा आपण कामांमध्ये मुलांकडे दुर्लक्ष करतो. परंतु तुमची एक चूक चांगलीच महागात पडू शकते. हे या व्हिडिओतून समोर आलेले आहे. असाच एक घटनेचा प्रकार चेन्नईमधून समोर आलेला आहे. यामध्ये एक बाळ गॅलरीमधून पडून इमारतीच्या पत्रावर अडकलेले दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या देखील हृदयाचा ठोका नक्कीच चुकेल.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान बाळ बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर बाल्कनीतील प्लास्टिकच्या छतावर अडकले दिसत आहे. हे बाळ आठ (Viral Video) महिन्याचे होते. दूध पाजताना ही मुलगी खाली सटकल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये सोसायटीतील सगळे लोक या बाळाला कसे वाचवता येईल याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे हे बाळ खूप रडत आहे. तर दुसरीकडे त्या बाळाला वाचवण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहे. शेवटी लोकांनी इमारतीच्या खाली मोठा कपडा पकडून, तर कोणी गॅलरीच्या बाहेर येत बाळाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. हे पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

प्रत्येकजण खिडकीतून बाहेर येऊन दुसऱ्याची मदत करत बाळाला खाली ओढण्याचा प्रयत्न करत होते. अनेकांचा हात पोहोचत नव्हता. असेच एका व्यक्तीने स्वतःचा जीव धोक्यात घालून छतावरून त्या बाळाला खाली काढले. त्याचप्रमाणे या व्यक्तीचे देखील सगळ्यांना कौतुक केले. त्याचप्रमाणे बाळाचे प्राण वाचल्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी देखील त्या बाळाच्या व्यक्तीचे कौतुक केले. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला हजारो व्ह्युज आलेले आहेत.