Viral Video | 100 रुपयाच्या नोटीचा वापर करून पठ्याने केला मार्केटिंगचा नवा जुगाड; पाहा व्हिडिओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोणताही व्यवसाय सुरू करायचा म्हटला, तर ग्राहक आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे जाहिरात.. आपण आपल्या व्यवसायाची जेवढी जास्त जाहिरात करू तेवढे जास्त ग्राहक आपल्याकडे येतात. परंतु आजकाल जाहिरातींवर आणि मार्केटिंगवर भरपूर पैसा खर्च करावा लागतो. अशातच काही लोकांनी एक जुगाड शोधून काढला आहे. आणि या जुगाडाच्या माध्यमातून त्यांनी अगदी फ्रीमध्ये त्यांच्या कॅफेची जबरदस्त जाहिरात केलेली आहे. हा व्हिडिओ (Viral Video) पाहून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल.

कॅफेची जाहिरात करण्यासाठी या लोकांनी 100 रुपयांच्या नोटेसारखा दिसणारा एक कागद वापरलेला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. त्यांनी कॅफेच्या जाहिरातीसाठी ही कल्पना वापरलेली आहे. त्यांनी 100 रुपयासारखा दिसणारा एक कागद छापलेला आहे. त्यांनी या कागदाची घडी करून जागोजागी टाकलेली आहे. 100 रुपयेची नोट असलेली बाजू वर केलेली आहे. तर ती घडी उघडल्यावर दुसऱ्या बाजूला त्यांनी त्यांच्या कॅफेची जाहिरात केलेली आहे.

https://www.instagram.com/reel/C0wPWyVpFOe/?utm_source=ig_embed&ig_rid=2a39b387-9710-439b-9a12-528ca541e7b5

जर रस्त्यावर कोणालाही 100 रुपये पडलेले दिसले, तर त्याकडे कुणीही दुर्लक्ष करू शकत नाही. अगदी ते पैसे कोणाचे आहेत? असे म्हणून का होईना पण कोणताही व्यक्ती नक्कीच 100 रुपयाची नोट उचलायला जाईल. हीच कल्पना करून या माणसांनी त्यांच्या कॅफेची जाहिरात त्यांच्या कॅफेची जाहिरात करण्यासाठी एक देसी जुगाड शोधून काढलेले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या कल्पनेचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

त्यांचा हा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलेला आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत तीन लाख 11 हजारापेक्षा जास्त लाईक केलेले आहे त्याचप्रमाणे अनेक युजर त्यांच्या या व्हिडिओवर कमेंट करून त्याच्या या कल्पनेला वाव देत आहे.