अहमदनगर येथील ‘या’ विद्यार्थ्यांच्या आवाजाने अवघ्या महाराष्ट्राला लावले वेड, Video व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर : हॅलो महाराष्ट्र – लहान मुलांच्या डान्सचे, डायलॉगचे किंवा गाण्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल (video viral) होताना आपण पाहिले असतील. आणि या व्हिडिओंवर अनेक युजर्स लाईक देखील करतात. अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वायरल (video viral) होत आहे. या व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी “चंद्रमुखी” या चित्रपटातील ‘चंद्रा’ हे गाणं गाताना दिसत आहे. या विद्यार्थ्यांचा आवाज ऐकून आपल्याही तोंडातून वा! असा उद्गार निघाल्याशिवाय राहणार नाही. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ (video viral) अहमदनगर जिल्ह्यातील करजगाव येथील आहे.

https://www.facebook.com/krushna.rathod.7359/videos/500061528125695/?t=0

ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांमध्ये देखील अनेक कलागुण दडलेले असतात. हे या व्हिडिओतून नक्कीच स्पष्ट होते. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव जयेश खरे असे असून हा विद्यार्थी चंद्रा ही लावणी आपल्या सुरेख आवाजात गाताना दिसत आहे. जयेश सहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्याचे शिक्षक कृष्णा राठोड यांनी हा व्हिडिओ त्यांच्या फेसबुक अकाउंट वरून शेअर केला आहे. या व्हिडिओत जयेश याच्या आवाजाचा गोडवा आणि अप्रतिम चढउतारा ऐकून आवक झाल्याशिवाय कोणीच राहू शकत नाही. या व्हिडिओवर खुद्द अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी देखील कमेंट केली आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना शिक्षक कृष्णा राठोड यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “करजगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात बदली झाल्यानंतर इयत्ता सहावीच्या वर्गात माझा पहिला दिवस होता. विद्यार्थ्यांची ओळख होत असताना त्यांच्यातील विशेष गुणांची तपासणी करत असताना जयेश खरे नावाच्या विद्यार्थ्यांनी एक अप्रतिम गाणे सादर केले. हे गाणे ऐकल्यानंतर चक्क पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचे एक वाक्य आठवल्या शिवाय राहत नाही ते म्हणजे, मातीमध्ये अनेक प्रकारची रत्ने तुम्हाला सापडतील फक्त ती माती ढवळण्याची गरज आहे.”

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर