Viral Video : महिला पोलिसाचा खाकी वर्दीतला ‘हा’ व्हिडिओ व्हायरल; SP ने दिले चौकशीचे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Viral Video : उत्तर प्रदेशातील बहराइचमधून नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे. जिथे एका महिला कॉन्स्टेबलने खाकी गणवेश घालून बनवलेली Facebook Reels प्रचंड व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये ही महिला कॉन्स्टेबल एका चित्रपटाचे डायलॉग्स बोलताना दिसून येते आहे. याप्रकरणी आता येथील पोलीस अधीक्षकांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

याविषयीची अधिक माहिती अशी कि, उत्तर प्रदेश मधील बहराइचमध्ये पोलिसांच्या डायल 112 मध्ये काम करणाऱ्या एका महिला कॉन्स्टेबलने आपल्या खाकी गणवेशात एक Facebook Reels तयार केली. जी सध्या प्रचंड व्हायरल (Viral Video) झाली आहे. व्हायरल झालेल्या रीलमध्ये संगीता नावाची ही महिला कॉन्स्टेबल ‘मुलाकात अगर मौत है तो मिलवाओ मुझसे’ असा डायलॉग बोलताना दिसून येते आहे. हा रील समोर आल्यानंतर आता बहराइचच्या पोलिस अधीक्षकांकडून याविषयी चौकशीचे आदेश दिले गेले आहेत.

A Woman Sipahi Video Went Viral On Social Media In Bahraich. - Bahraich: मुलाकात अगर मौत है तो मिलवाओ हमसे... गाने पर महिला सिपाही का वीडियो वायरल, जांच के निर्देश - Amar

हे जाणून घ्या कि, याआधी मुरादाबाद येथील दोन महिला कॉन्स्टेबल देखील खाकी गणवेशातील दोन व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करून चर्चेत आल्या होत्या. मात्र एडीजी मुख्यालयात याबाबतची माहिती कळताच या दोन्ही महिला कॉन्स्टेबलला तत्काळ निलंबित करत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच यानंतर आता कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याने गणवेश घालून व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर (Viral Video) अपलोड केला तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशा सूचना बरेली-मुरादाबाद झोनमधील सर्व SSP ना देण्यात आली आहे.

सोशल मीडियावर झटपट प्रसिद्ध होण्याची क्रेझ

पोलिसी गणवेश घालून फेसबुक, इन्स्टा रील्स बनवण्याच्या अनेक घटना याआधीही घडल्या आहेत. हे लक्षात घ्या कि, पोलिसी खाक्या दाखवत सोशल मीडियावर (Viral Video) झटपट प्रसिद्ध होण्याची क्रेझ सध्या पोलिसांमध्ये चांगलीच वाढली आहे. अनेक पोलिस कर्मचारी फेसबुक लाईव्ह आणि यूट्यूबवर आपले व्हिडिओ अपलोड करत असल्याचे अनेकदा पाहायला मिळते.

हे पण वाचा :

ICICI Bank च्या खातेदारांना WhatsApp द्वारे उपलब्ध होणार ‘या’ सुविधा

FD Rates : ‘या’ बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांना FD वर दिले जाते 7.50% पर्यंत व्याज

Indian Overseas Bank च्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ, नवीन दर पहा

Post Office च्या FD मध्ये आकर्षक व्याजदरासोबतच मिळतात ‘या’ सुविधा

Gold Price : सोने-चांदी महागले, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती !!!