Viral Video : साप …! असा शब्द जरी उच्चारला तरी भल्याभल्यांची भंबेरी उडते. पळता भुई थोडी होते. जगात आढळणाऱ्या सगळ्याच सापाच्या जाती विषारी असतातच असे नाही. ही गोष्ट माहिती असताना देखील साप म्हंटल्यावर भीती वाटू लागते. पण सापाचे सूप तुम्हाला दिले तर ? ऐकूनच किळसवाणे वाटते ना ? सोशल मीडियावर(Viral Video) सापाचे सूप पितानाचा एका तरुणीचा व्हिडीओ भलताच व्हायरल होतो आहे. पण त्याच्यावर आलेल्या कमेंट्स वाटून तुमचे मनोरंजन झाल्याशिवाय राहणार नाही.
जगभरात वेगवगळे पदार्थ व्यंजन म्हणून खाल्ले जातात. त्यातही नॉनव्हेज खाणाऱ्यांची (Viral Video) संख्या मोठी आहे. मग त्यामध्ये अगदी विषारी पफर फिश पासून झुरळ आणि इतर प्राणी खाल्ले जातात. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये एक तरुणी चक्कं सपाचे सूप बनवून पित आहे. एवढेच नाही तर हे सूप खूप टेस्टी असल्याचे सांगत आहे.
काय आहे व्हिडीओ (Viral Video)
तुम्ही जेव्हा हा व्हिडीओ ओपन करता तेव्हा एक तरुणी दिसते शिवाय मस्त अशा ठिकाणी ती ओपन कुकिंग करीत असल्याचे कळते. त्यानंतर आपल्याला एका भांड्यात काहीतरी शिजत असल्याचे दिसते. यावेळी भांड्याचे झाकण बंद असते. मात्र ही तरुणी जेव्हा भांड्याचे झाकण उघडते तेव्हा त्यात चक्क काळ्या कुट्ट रंगाच्या सापाचे तुकडे शिजत (Viral Video) असलेले दिसतात. त्यानंतर ही तरुणी त्या भांड्यातील सूप एका पळीमध्ये घेते आणि फुंकून फुंकून ती हा सूप पिते. एवढेच नाही तर व्हिडिओच्या शेवटी ही तरुणी हा सूप खूपच टेस्टी असल्याचे सांगते. असा हा व्हिडीओ आहे.
sokmonileak नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ (Viral Video) शेअर करण्यात आला आहे. शिवाय या पोस्ट सोबत तिने लिहले आहे की ‘स्नेक टेस्ट इज यम्मी …!’ म्हणजेच “सापाचा सूप खूप स्वादिष्ट आहे’. व्हिडीओ व्हायरल होताच अनेक कमेंट व्हिडीओवर येताना दिसत आहेत. काहींनी म्हटलं बरं झालं मी भारतात राहतो आणि असलं काही खात नाही. एकाने लिहिले आहे की, “हे पाहून मला उलटी येतीये”. आणखी एका भारतीय युजरने लिहिले आहे की “भारतात आम्ही सापाची पूजा करतो”.