Viral Video : 25 वर्षीय महिला कुस्तीपटूने युजवेंद्र चहलला उचलून गरागरा फिरवलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video : भारताचा लग स्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) अनेक दिवसांपासून संघाबाहेर आहे. गेल्या वर्षभरापासून चहल आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळलेला नाही. मात्र नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांनी तो चर्चेत असतोच. आताही चहलचा एक विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये महिला भारतीय कुस्तीपटू संगीता फोगटने (Sangeeta Phogat) त्याला खांद्यावर उचलून गरागरा फिरवलं असल्याचे दिसत आहे. हा विडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल.

काय आहे या विडिओ मध्ये – Viral Video

युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने या सीझनमध्ये ‘झलक दिखला जा’ या डान्स रिॲलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता.’ झलक दिखला जा’ या डान्स रिॲलिटी शोच्या पार्टीदरम्यान, भारतीय महिला कुस्तीपटू संगीता फोगटने युजवेंद्र चहलला आरामात दोन्ही हातानी वर खांद्यावर उचलले आणि गोल गोल फिरवले. संगीता फोगटने चहलला इतक्या फास्ट गरागरा फिरवलं कि त्याला चक्कर येऊ लागली. यानंतर त्याने हसत हसत संगीता फोगटला थांबण्याचा इशारा केला. हे पाहून आजूबाजूचे लोकही खूप हसायला लागले. सोशल मीडियावर हा विडिओ (Viral Video) वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

दरम्यान, ‘झलक दिखला जा’ च्या या सीझनमध्ये संगीता फोगटने स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. मात्र, संगीता फोगट यापूर्वीच ‘झलक दिखला जा’ शोमधून बाहेर पडली आहे. संगीता फोगट ही ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाची पत्नी आहे. संगीता फोगट ही राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेती आणि महिला कुस्तीपटू गीता फोगटची बहीण आहे.

तर दुसरीकडे, चहल बद्दल सांगायचं झाल्यास, सुरुवातील अतिशय दमदार कामगिरी करत भारतीयांचे लक्ष्य वेधणाऱ्या चहल साठी मागील काही वर्षे खास गेलेली नाहीत. अनेक दिवसांपासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून दूर आहे. चहलने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ऑगस्ट 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. आता त्याची नजर आयपीएल वर असेल. यजुवेंद्र चहल राजस्थान रॉयल्सकडून IPL खेळताना दिसणार आहे.