Viral : महिलेने केला पतीच्या मृतदेहासोबत 1 तास 35 मिनिटे प्रवास ; कुणालाच कळले नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral : कधी कधी प्रवास करताना अनपेक्षित घटना घडत असतात. एका जोडप्याचा असाच एक विमान प्रवास सध्या चर्चेचा विषय झाला आहे. एक जोडपे विमान प्रवास करावीत असताना पतीचा मृत्यू झाला. महिलेच्या पतीच्या मृत्यूची खबर कोणालाही कानोकान लागली नाही. नाही सहप्रवाशाना ना विमानाच्या करू मेम्बर्सना एवढेच काय काय सोबत असलेल्या महिलेला देखील (Viral) प्रवास संपल्यानंतर समजले की ती आपल्या पतीच्या मृतदेहासोबत प्रवास करीत होती. चला जाणून घेऊया नेमकी घटना काय आहे ?

वृत्तानुसार, 59 वर्षीय ब्रिटीश नागरिक 24 फेब्रुवारी रोजी आपल्या पत्नीसोबत फॉकलंड बेटांवर भेटीसाठी आला होता. येथून दोघांना चिलीतील पुंता अरेनास येथे विमानाने जायचे होते. मग तिथून सँटियागोला जायचे होते. शनिवारी, पती-पत्नी दोघेही चिलीच्या लॅटम विमानाने प्रवास (Viral) करू लागले. दोघेही फ्लाइटमध्ये चढले. विमानाने उड्डाण घेतले. सर्व काही ठीक होते. पण विमान पुंता अरेनासमध्ये उतरताच सर्वजण आपापल्या जागेवरून उठू लागले.

मृतदेहासोबत प्रवास (Viral)

पण ब्रिटिश नागरिक आपल्या जागेवरून उठला नाही. पत्नीला वाटले की तो झोपला असावा. त्यामुळे तिने पतीला उठवण्याचा प्रयत्न केला. पण नंतर तिला दिसले की तिच्या पतीचा श्वास थांबला आहे आणि त्याचे शरीर थंड झाले आहे.महिलेने (Viral) मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. क्रू मेंबर्सही तिथे आले. त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. म्हणजे सर्व प्रवासी 1 तास 35 मिनिटे मृतदेह घेऊन प्रवास करत राहिलेखाली उतरल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समजताच एकच खळबळ माजली. सर्वजण विमानातून उतरले आणि मृतदेहही खाली उतरवण्यात आला.

व्यक्तीला होते आजार

विमानतळावर उपस्थित पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पुंता अरेनास (Viral) येथील स्पेशलिस्ट युनिटचे उपायुक्त डिएगो डायझ यांच्या म्हणण्यानुसार, त्या व्यक्तीचा मृत्यू आरोग्याशी संबंधित कारणांमुळे झाला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये ही बाब समोर आली आहे. त्यांच्या पत्नीनेही याला दुजोरा दिला. पती खूप आजारी असल्याचे सांगितले. त्याला अनेक आजार होते.