व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

श्रीलंकेविरुद्ध सामन्यांपूर्वी विराट कोहलीन घेतला ‘हा’ मोठा निर्णय; आता यापुढे टी-20 क्रिकेटमध्ये…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला पुढील वर्षांपासून म्हणजे 3 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पण या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज विराट कोहली याने आपल्या क्रिकेट प्रेमींना धक्का दिला आहे. त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

विराट कोहली हा खेळणार नसल्याबाबत बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. त्या अधिकाऱ्याने म्हंटले आहे की, विराटने कळवले आहे की तो टी20 सामन्यांसाठी उपलब्ध नाही. वनडे मालिकेतून तो संघात पुनरागमन करेल.

विराटने सध्या जरी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले असले तरी तो टी-20 इंटरनॅशनलमधून किती काळ ब्रेक घेत आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे, रोहित शर्माबद्दल बोलायचं झाले तर, आम्हाला त्याच्या पुनरागमनाची घाई करायची नाही. तो पूर्णपणे फिट आहे की नाही हे येत्या काळात ठरवले जाईल. त्याने फलंदाजीचा सराव सुरू केला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

दरम्यान, आता विराट कोहलीने T20 आंतरराष्ट्रीय मधून ब्रेक घेण्याच्या निर्णयानंतर श्रीलंकेविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या T20 मालिकेत तो दिसणार नाही हे जवळपास नक्की झाले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिका पुढील वर्षी 3 जानेवारीपासून सुरू होत आहे. याआधी सर्वांना वाटत होते की विराट या मालिकेत उपलब्ध होईल पण विराटने टी-20 मधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेऊन सर्वांना धक्का दिला आहे.