Virat Kohli : विराट कोहलीला T20 वर्ल्डकप मधून डच्चू?? समोर आलं धक्कादायक कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा (Virat Kohli) यंदाच्या टी-२० विश्वचषकात (T20 World Cup 2024) समावेश होणार नाही अशी बातमी समोर येत आहे. “टेलिग्राफ” मधील एका वृत्तानुसार, निवडकर्ते कोहलीला T20 विश्वचषकासाठी निवडण्यास कचरत आहेत कारण अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये होणाऱ्या या स्पर्धेत संथ खेळपट्ट्या असणार आहेत, अशावेळी कोहलीची कामगिरी योग्य ठरणार नाही असं बीसीसीआयला वाटत आहे.

मागील वर्षभरापासून भारतीय क्रिकेट मध्ये अनेक नव्या दमाच्या आणि आक्रमक खेळाडूंचा उदय झाला आहे. यामध्ये सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, शिवम दुबे या खेळाडूंचा समावेश आहे. बीसीसीआयच्या मते, हे युवा खेळाडू कोहलीपेक्षा चांगली कामगिरी करू शकतात. एका वृत्तानुसार, BCCI ने विराट कोहलीच्या (Virat Kohli) T20 मधील भविष्याची निवड मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यावर सोपवली आहे. कोहलीला टी-२० विश्वचषकात स्वतःची दावेदारी मजबूत करायची असेल तर २२ मार्च पासून सुरु होणाऱ्या IPL मध्ये दमदार कामगिरी करावी लागेल.

आक्रमक क्रिकेटचा कोहलीमध्ये अभाव? Virat Kohli

गेल्या अनेक दिवसांपासून विराट कोहली क्रिकेट पासून दूर आहे. T20 विश्वचषक 2022 पासून कोहलीने कोणताही आंतरराष्ट्रीय T20 सामना खेळलेला नाही. तसेच अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी T20 मालिकेसाठी त्याची निवड होईल कि नाही याबाबत सुद्धा शंका आहे. असे मानले जाते की, T20 मध्ये कशा पद्धतीने आक्रमक क्रिकेट खेळायला हवं याबाबत अजित आगरकर यांनी कोहलीबाबत चर्चा केली होती, जे कोहलीने अफगाणिस्तान T20I मालिकेत लागू करण्याचा प्रयत्न केला, परंतु फारसे यश मिळाले नाही. यापूर्वी, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी म्हंटल होते कि रोहित शर्मा T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचे नेतृत्व करेल, परंतु कोहलीच्या T20I भविष्याबद्दल त्यांनी भाष्य केले नाही.