भर मैदानातच कोहलीची रोहित शर्मासोबत मस्ती; Video होतोय व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेटचे 2 अनमोल हिरे विराट कोहली आणि रोहित शर्मा (Virat And Rohit) यांच्यातील मैत्री आपल्याला माहितच आहे. दोन्ही खेळाडूंचे फॅन्स एकमेकांशी वाद घालत असले तरी रोहित आणि विराटच मात्र चांगलं जमत.. काल आयपीएल मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरू सामन्यात याचाच प्रत्यय आला. विराट कोहली भर मैदानातच रोहित शर्मासोबत मस्ती करताना दिसला. याबाबतच विडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा विडिओ पाहून रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांच्याही चाहत्यांना आनंद होईल.

काय आहे व्हिडिओत-

मुंबईच्या डावाची सुरुवात झाल्यानंतर रोहित शर्मा आणि ईशान किशन फलंदाजीला आले. त्याच दरम्यान, रोहित नॉन स्ट्रायकर एन्डवर उभा असताना विराट पाठीमागून आला आणि रोहितच्या पोटाला डिवचून गेला. सुरुवातीला रोहित शर्माही आश्चर्यचकित झाला, मात्र त्यानंतर विराटला पाहताच त्यानेही त्याला थम्प दाखवतो आणि मग दोघंही व्हिडीओमध्ये हसताना दिसतात.सोशल मीडियावर हा विडिओ अगदी वाऱ्यासारखा पसरला. विराटचा मैदानावरील हटके मूड पुन्हा एकदा समोर आला.

मुंबईचा दणदणीत विजय –

दरम्यान, वानखेडेवरील कालच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने आरसीबीचा दारुण पराभव केला. प्रथम फलंदाजी करता बंगळुरूच्या संघाने ८ बाद १९६ धावा केल्या. जसप्रीत बुमराहने ५ बळी घेत रेकॉर्ड केला. मात्र मुंबईच्या वादळी फलंदाजीपुढे आरसीबीचे आव्हान अगदीच किरकोळ वाटलं. मुंबई इंडियन्सने अवघ्या १६ व्या षटकातच १९६ धावांचा पाठलाग केला. ईशान किशन आणि रोहित शर्माने चौकार षटकारांचा पाऊस पाडत ९ ओव्हर मध्येच शतकी सलामी दिली. ईशान किशनने ३४ चेंडूंत ६९ आणि रोहित शर्माने २४ चेंडूत ३८ धावा केल्या. ईशान किशन बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि बेंगलोरच्या गोलंदाजांना चांगलाच चोप दिला. त्याने फक्त १९ चेंडूत ५२ धावांची धडाकेबाज खेळी करत मुंबईला मोठा विजय मिळवून दिला.