Virender Sehwag Arabic Look : वीरेंद्र सेहवागच्या अरेबिक लूकवरून गोंधळ; नेटकऱ्यानी चांगलंच सुनावलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Virender Sehwag Arabic Look : भारताचा माजी आक्रमक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग हा नेहमीच कोणत्या ना एकोणत्या कारणांनी चर्चेत असतो. सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असणार सेहवाग राष्ट्रभक्तीवर भाष्य करताना अनेकदा आपण ऐकलं असेल. परंतु हाच सेहवाग त्याच्या एका अनोख्या लूकमुळे टीकेचा धनी झाला आहे. ILT20 फायनलवेळी सेहवागने पाकिस्तनाच्या शोऐब अख्तर सोबत अरेबिक वेष परिधान केला. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यानी त्याची तुफान धुलाई केली.

सेहवागवर चाहते भडकले – Virender Sehwag Arabic Look

इंटरनशनल लीग T20 फायनलसाठी वीरेंद्र सेहवाग दुबईला पोहोचला. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर MI एमिरेट्स आणि दुबई कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात त्याने कॉमेंट्री केली. यावेळी त्याच्यासोबत पाकिस्तानचा माजी स्टार गोलंदाज शोएब अख्तरही दिसला.दोघेही अरेबियन लूकमध्ये दिसले. इस्लामिक देशांमध्ये लोकप्रिय असलेला जुब्बा दोघांनीही घातला होता. मात्र आता याच लूकमुळे (Virender Sehwag Arabic Look) सेहवागवर टीका केली जात आहे. एक यूजर्स म्हणाला, ज्या सेहवागला भारताचे नाव बदलून ‘भारत’ करायचे होते. आज तोच अरबी पोशाख परिधान करतो. तर दुसऱ्या एका यूजर्सने म्हंटल,सेहवागचा ढोंगीपणा उघड! वीरेंद्र सेहवाग भारतीयांना राष्ट्रवाद आणि देशभक्तीबद्दल व्याख्यान देतो आणि आता तो UAE मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरसोबत कॉमेंट्रीचा आनंद घेत आहे.

MI एमिरेट्सने जिंकली इंटरनशनल लीग T20 फायनल-

इंटरनशनल लीग T20 फायनलमध्ये, MI एमिरेट्सने दुबई कॅपिटल्स दणदणीत पराभव करत ट्रॉफी आपल्या नावावर केली. MI एमिरेट्सने 20 षटकात 3 गडी गमावून 208 धावा केल्या. मोहम्मद वसीमने 43 धावां, आंद्रे फ्लेचर 53, कुसल परेराने 38, आणि निकोलस पूरनने 57 धावांची खेळी खेळली. तर प्रत्युत्तरात दुबई कॅपिटल्स १६३ धावाच करू शकली. निकोलस पूरण मॅन ऑफ द मॅच ठरला तर सिकंदर रझा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला.