सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांना कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. ताप आणि अंगदुखीची लक्षणे दिसूलागल्याने त्यांनी चाचणी करून घेतली होती. त्याचा अहवाल आज कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यांना कोणताही त्रास होत नसल्याने विश्वजित कदम यांना पुण्यातील त्यांच्या घरी अलगीकरण करण्यात आले असून त्या ठिकाणी उपचार सुरु आहेत. स्वतः विश्वजित कदम यांनी फेसबुक पेज द्वारे हि माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून खबरदारी बाळगावी असे आवाहन हि त्यांनी यावेळी केले आहे. यापूर्वी आमदार मोहनराव कदम यांच्या त्यांच्या कुटुंबातील चौघांचा कोरोनाची लागण झाली होती.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. या मध्ये जिल्ह्यातील अनेक आजी माजी आमदारांना कोरोनाचा विळखा बसला आहे. यातून अनेकजण कोरोनमुक्त हि झाले आहेत. आत जिल्ह्यातील कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनाही कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत विश्वजित कदम यांनी लिहिलेल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हंटले आहे कि, माझा पलूस कडेगांव मतदारसंघ, सांगली जिल्हा, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून विविध योजनांचा पाठपुरावा, कोरोना संसर्ग रोखण्याच्या उपाययोजना, मंत्रालयातील बैठका, भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने पूरपरिस्थिती दौरे, भारती विद्यापीठ कामकाज अशा धावपळीच्या कारभारात योग्य ती वैद्यकीय खबरदारी घेत होतोच. परंतु अखेर मला कोरोना संसर्ग झालाच! थोडा ताप आणि अंगदुखी, अशी सौम्य लक्षणे दिसू लागल्याने काल चाचणी करून घेतली. आज त्याचा अहवाल आला आणि मी कोरोना पॉझिटिव्ह झालो आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी बाळगवि असे आवाहन करत माझ्या तब्येतीला कोणताही धोका नाही. वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घरीच विलगीकरणात मी उपचार घेत आहे. माझे कार्यालय नियमित सुरू असून मी देखील फोनच्या माध्यमातून उपलब्ध राहण्याचा प्रयत्न करेन. कोरोना संसर्गातून पूर्ण बरा होत लवकरच आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन, अशी ग्वाही त्यांनी पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. यापूर्वी जिल्ह्यातील आ. सुधीर गाडगीळ, आ. विक्रमसिंह सावंत, आ. सुमनताई पाटील, आ. अनिल बाबर, आ. सुरेश खाडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यमंत्री विश्वजित कदम यांना कोरोनाची लागण झाल्याने पलूस – कडेगाव मतदार संघात खळबळ उडाली आहे.