सध्या कडक उन्हाळा सुरु आहे. शिवाय एप्रिल आणि मे महिन्यात प्रत्येकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्यासाठी प्लॅन करीत असतो. तुम्ही सुद्धा थंडगार हिल स्टेशनला जायचा प्लॅन करीत असाल तर तुमच्यासाठी एका अप्रतिम ठिकाणाची माहिती आजच्या लेखामध्ये देत आहोत. खरंतर प्रत्येक प्रवासप्रेमीच्या यादीत असावं असं एक खास हिल स्टेशन उत्तराखंडमध्ये आहे, जे सौंदर्यानं स्वित्झर्लंडला ही मागे टाकतं. विशेष म्हणजे या ठिकाणी केवळ भारतीय नागरिकांना प्रवेश आहे. परदेशीयांसाठी प्रवेश बंद आहे.
1866 साली ब्रिटिशांनी वसवलेलं हे खास ठिकाण
चकराता हे निसर्गरम्य हिल स्टेशन 1866 साली ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वसवलं होतं. तेव्हा पासून हे ठिकाण वरिष्ठ ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी एक सुट्टीचं गुप्त ठिकाण होतं. आजही त्याच सौंदर्यानं हे ठिकाण पर्यटकांना भुरळ घालतं.
का बंद आहे परदेशीयांना प्रवेश?
चकरातामध्ये भारतीय लष्कराचं महत्त्वाचं कॅम्प असल्यामुळे सुरक्षा कारणास्तव इथे परदेशीयांना प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. मात्र भारतीय नागरिक कोणत्याही अडथळ्याशिवाय इथं प्रवास करू शकतात.
चकराताची आकर्षणस्थळं
चकरातामधील काही प्रमुख आकर्षणस्थळांमध्ये टायगर फॉल्स, बुधेर गुंफा आणि चिलमिरी नेक यांचा समावेश होतो. या सर्व ठिकाणी पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात रोमांचकारी अनुभव मिळतो.
कसं पोहोचाल?
- रेल्वे मार्ग: देहरादून हे चकराताचं सर्वात जवळचं रेल्वे स्थानक आहे. इथून चकराताची अंतर सुमारे 90 किमी आहे.
- हवाई मार्ग: जॉली ग्रँट विमानतळ हा सर्वात जवळचा विमानतळ आहे.
- सड़क मार्ग: चकराता हे रस्ते मार्गाने उत्तम प्रकारे जोडलेलं आहे, त्यामुळे स्वतःच्या वाहनाने किंवा कॅबनेही इथे पोहोचता येतं.
जर तुम्ही भारतीय नागरिक असाल आणि एक अशी ठिकाणं शोधत असाल जिथं फक्त भारतीयच फिरू शकतात, तर चकराता तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. निसर्गप्रेम, शांतता, आणि थोडा देशभक्तीचा अभिमान – हे सगळं एकत्र अनुभवाल फक्त चकरातामध्ये!




