माता वैष्णो देवी मंदिर भारतातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक आहे. दरवर्षी हजारो भाविक जम्मूच्या कटरा येथे माता राणीच्या दर्शनासाठी येतात. जर तुम्हीही वैष्णो देवीच्या दर्शनासाठी जाणार असाल, तर ही यात्रा आणखी खास बनवा दर्शनानंतर जवळील नैसर्गिक आणि सुंदर स्थळांना भेट देऊन आपल्या प्रवासाला संस्मरणीय बनवा.
वैष्णो देवीच्या जवळ फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे
बटोत हिल स्टेशन – निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घ्या
जर तुम्हाला शांत आणि निसर्गरम्य वातावरण आवडत असेल, तर बटोत हिल स्टेशन नक्की भेट द्या. कटरा पासून ८० किमी अंतरावर असलेले हे ठिकाण ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि साहसी उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. डोंगरमाथ्यावरून दिसणारे हिरवेगार निसर्गदृश्य आणि आल्हाददायक हवा तुम्हाला एक वेगळाच अनुभव देईल.
पटनीटॉप – साहस आणि बर्फवृष्टीचा आनंद घ्या
एडव्हेंचर आणि रोमांच आवडणाऱ्यांसाठी पटनीटॉप हे उत्तम ठिकाण आहे. हे एक प्रसिद्ध हिल स्टेशन असून येथे ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग आणि रॉक क्लाइंबिंग सारख्या साहसी उपक्रमांचा आनंद घेता येतो. डिसेंबर- जानेवारी मध्ये येथे बर्फवृष्टी होते, त्यामुळे जर तुम्हाला हिमवर्षावाचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल, तर हा उत्तम पर्याय आहे.
झज्जर कोटली – एक परिपूर्ण पिकनिक स्पॉट
जर तुम्हाला कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत निवांत वेळ घालवायचा असेल, तर झज्जर कोटली हे ठिकाण नक्कीच भेट द्यायला हवे. वैष्णो देवी मंदिरापासून ३० किमी अंतरावर असलेले हे ठिकाण सुंदर पाण्याचे झरे, हिरवेगार डोंगर आणि स्वच्छ हवेसाठी प्रसिद्ध आहे. हे ठिकाण पिकनिकसाठी आणि फोटोग्राफीसाठी देखील उत्तम आहे.
वैष्णो देवी यात्रा ही केवळ धार्मिक यात्राच नाही, तर ती एक संस्मरणीय पर्यटन अनुभव देखील बनू शकते. माता राणीच्या दर्शनानंतर या सुंदर ठिकाणांना भेट द्या आणि आपल्या प्रवासाला एक वेगळीच मजा द्या