Vistara Airlines | विस्तार एयरलाइनच्या 100 पेक्षा जास्त फ्लाईट्स रद्द, नागरी उड्डाण मंत्रालयाने मागितला सविस्तर अहवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Vistara Airlines | विस्तारा या एअरलाइन कंपनीकडून गेल्या आठवड्यात 100 पेक्षा अधिक त्यांच्या फ्लाईट रद्द झालेल्या आहेत. याबाबत नागरी उड्डाण मंत्रालयाने याबाबत त्यांच्याकडून अहवाल मागितला होता. नागरी उड्डाण मंत्रालयाने विस्तारा (Vistara Airlines) कंपनीकडून फ्लाईट रद्द करणे त्याचप्रमाणे खूप विलंब झाला.यावर अहवाल मागितला अशी माहिती एनआयएकडून आलेली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार पायलटची कमतरता असल्यामुळे विस्तारा त्यांचे पूर्ण सेवा वाहक फ्लाईट ऑपरेशन तात्पुरते का होईना कमी करणार आहे. ज्यामुळे सोमवारी अंदाजे 50 फ्लाईट रद्द करण्यात आल्या आणि मंगळवारी ही संख्या 70 पर्यंत वाढू शकते.

एअर लाईनला (Vistara Airlines) त्यांच्या फ्लाईटसाठी अधिकाऱ्यांची कमतरता भासत आहे. जे नवीन कार्यामुळे आणि वेतनात बदल केल्यामुळे निषेध करत आहे. त्याचप्रमाणे काही आठवड्यांपासून ते आजारी असल्याचे देखील तक्रारी येत होत्या.

एअरलाईन समोर जी आव्हान आहे त्याबाबत सांगताना विस्ताराच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, “गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या संख्येने फ्लाईट रद्द होत आहेत. किंवा विविध कारणांमुळे त्याला लेट होत आहे. ज्याला कारण क्रूची उपलब्धता आहे. आम्ही आमच्या नेटवर्कवर पुरेशी कनेक्टिव्हिटी निश्चित करण्यासाठी चालविलेल्या फ्लाईटची संख्या तात्पुरती कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे.” त्याचप्रमाणे विमान कंपनीने उडाणातील व्यक्ती याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे. परंतु त्यांनी रद्द केलेल्या फ्लाईटच्या संख्येबद्दल अजूनही त्यांनी तपशील सादर केलेला नाही.